Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आता प्रशासक राजवट नाही –कामकाजात सदस्यांना विश्वासात घ्या, अध्यक्षांचे खडेबोल ! शिक्षणाधिकारी रजेवर !सहकार सप्ताहनिमित्त गोकुळमध्ये वृक्षारोपण, अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यानगोकुळची बदनामी थांबवा, शेतकरी कुटुंबांतील मुलगा करणार आत्मक्लेश आंदोलनप्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी बाबू धोंडीबा परीटअ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांचा बुधवारी ग्रंथतुला करुन जाहीर सत्कारशिष्यवृत्ती परीक्षेत महापालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वलदुग्धजन्य पदार्थांच्या मूल्यवर्धनासंबंधी संशोधन, डॉ. ज्ञानेश्वर पंतगे यांच्या संशोधनाला पेटंटमहाराष्ट्र न्यूज वनवर शुभेच्छांचा वर्षाव, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिवसभर सदिच्छा !भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन करवीर तालुकाध्यक्षपदी मन्सूर सय्यदबदलत्या मानसिकतेची नवी पहाट, उच्चशिक्षित इंजिनीअर मुलीने केले शेतकरी मुलासोबत लग्न !!

जाहिरात

 

दुग्धजन्य पदार्थांच्या मूल्यवर्धनासंबंधी संशोधन, डॉ. ज्ञानेश्वर पंतगे यांच्या संशोधनाला पेटंट

schedule06 Jul 26 person by visibility 32 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर पतंगे हे दुग्धशास्त्र विषयातील नाविन्यपूर्ण संशोधनासाठी ओळखले जातात. त्यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या मूल्यवर्धनासाठी अनेक अभिनव संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या, नुकतेच त्यांच्या कल्पनेतून संशोधित केलेल्या "श्रीखंड फज निर्मिती प्रक्रिया" तंत्रज्ञानास भारत सरकारच्या बौद्धिक संपदा कार्यालयाने पेटंट प्रदान केले. आणि  बौद्धिक संपदा हक्क संरक्षित केले आहेत.
डॉ. पतंगे यांचे संशोधन अन्नप्रक्रिया क्षेत्रातील आहे. श्रीखंडापासून 'फज' या चॉकलेटसदृश खाद्यपदार्थाची निर्मिती करण्यात आली आहे. या उत्पादनासाठी श्रीखंडासोबत प्रमाणित अन्न घटक वापरले. विकसित केलेल्या श्रीखंड फजची साठवण क्षमता सामान्य तापमानात सुमारे ८० दिवसांपर्यंत असून याची चव अत्यंत स्वादिष्ठ आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाला व्यावसायिकदृष्ट्याही मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.फज हा दूध, साखर आणि लोणी (बटर) यांपासून बनवलेला एक अतिशय मऊ आणि गोड पदार्थ आहे. मराठीत याला 'मिल्क फज' किंवा 'मलाईदार गोड मिठाई' म्हटले जाऊ शकते.

         डॉ.पतंगे  यांचे  दुग्धशास्त्र  विषयातील हे दुसरे पेटंट असून त्यानी संशोधीत केलेल्या  ०६ शिफारसी प्रसारित झाल्या आहेत. हे संशोधन डॉ. पतंगे यांनी त्यांच्या पदव्युत्तर विद्यार्थी सुनील चव्हाण यांच्या मार्फत पूर्ण केले. या संशोधनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र कांबळे, प्रा. सी. व्ही. मेमाणे, सुशांत चौगुले, प्रा. शीतल पाटील यांचेही संशोधक म्हणून मोलाचे योगदान लाभले. या प्रक्रिया पेटंटचे अर्जदार महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आहेत.  या उल्लेखनीय संशोधनाबद्दल सर्व संशोधकांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे,  विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सत्तापा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे व विभाग प्रमुख डॉ.  दिनकर कांबळे   कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाने अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes