Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आता प्रशासक राजवट नाही –कामकाजात सदस्यांना विश्वासात घ्या, अध्यक्षांचे खडेबोल ! शिक्षणाधिकारी रजेवर !सहकार सप्ताहनिमित्त गोकुळमध्ये वृक्षारोपण, अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यानगोकुळची बदनामी थांबवा, शेतकरी कुटुंबांतील मुलगा करणार आत्मक्लेश आंदोलनप्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी बाबू धोंडीबा परीटअ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांचा बुधवारी ग्रंथतुला करुन जाहीर सत्कारशिष्यवृत्ती परीक्षेत महापालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वलदुग्धजन्य पदार्थांच्या मूल्यवर्धनासंबंधी संशोधन, डॉ. ज्ञानेश्वर पंतगे यांच्या संशोधनाला पेटंटमहाराष्ट्र न्यूज वनवर शुभेच्छांचा वर्षाव, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिवसभर सदिच्छा !भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन करवीर तालुकाध्यक्षपदी मन्सूर सय्यदबदलत्या मानसिकतेची नवी पहाट, उच्चशिक्षित इंजिनीअर मुलीने केले शेतकरी मुलासोबत लग्न !!

जाहिरात

 

अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांचा बुधवारी ग्रंथतुला करुन जाहीर सत्कार

schedule06 Jul 26 person by visibility 214 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूरचे सुपुत्र, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ  अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रंथतुला करून  जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन बुधवारी आठ जुलै 2000 26 रोजी आयोजित केला आहे  मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्यावतीने हा सत्कार समारंभ  राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पाच वाजता होत  असल्याची माहिती स्वागताध्यक्ष भरत रसाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  अ‍ॅड घाटगे यांची निवड ही कोल्हापूरच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत  विशेष सत्कार समारंभ पार पडणार आहे.

 खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत,  महापौर रुपाराणी निकम, साहित्यिक व चित्रपट निर्माते डॉ. रमेश विवेकी, उत्तम कांबळे यांच्या हस्ते अ‍ॅड.  घाटगे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
 सत्कारमूर्तींचा सन्मान पुष्पगुच्छ ,  शाल-श्रीफळाऐवजी वही, पेन आणि पुस्तक भेट देऊन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्ञानदान, वाचनसंस्कृती आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही संकल्पना समाजात सकारात्मक संदेश देणारी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
 नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांना सदिच्छा द्याव्यात असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला अनिल म्हमाने, सुरेश केसरकर, अ‍ॅड. करुणा विमल, मदन पवार, शंकर पुजारी, अंतिमा कोल्हापूरकर, सुनिल जाधव, अभिजीत मासुर्लीकर, गंगाधर म्हमाने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes