जिपच्या कृषी विकास अधिकारीपदी राजेंद्र माने
schedule23 Jul 25 person by visibility 98 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारीपदी राजेंद्र माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माने यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी माने हे रत्नागिरी येथे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारीपदाची जागा गेले दहा महिने रिक्त् होती. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांची बदली झाली. चव्हाण यांच्या बदलीपासून कृषी विकास अधिकारीपदी नवीन नियुक्ती झाली नव्हती. सारिका रेपे-वसगावकर यांच्याकडे प्रभारी कार्यभार होता.