Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणी टंचाईवरुन नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल, पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव टाकला लांबणीवरशिवाजी विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या १५० विद्यार्थ्यांची कंपन्यात निवडशिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे १९ विद्यार्थी यशस्वीकोल्हापुरात रविवारी राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषदसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक, डॉ शिवशंकर मोरजक्केंचे विशेष कौतुकसंजय भोसलेंचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाकडून नामंजूर, आयुक्तांनी निलंबित करावे – भूपाल शेटेटाकाऊतून टिकाऊ, भंगारातील गाडयांचे ट्रकमध्ये रुपांतर ! कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आयुक्तांची शाबासकी ! !काँग्रेसचे नगरसेवक धावले पंपिंग स्टेशनकडे, आयुक्त अधिकाऱ्यांकडूनही पाहणीपाण्याच्या उपलब्धतेच्या ठिकाणांवरील उपसाबंदी उठवावी, इरिगेशन फेडरेशनची मागणीटिक टिक वाजते डोक्यात… उलगडले घडयाळाशी जुळलेले बंध ! प्रकटला राजकारणापलीकडील कृतज्ञतेचा भाव !!

जाहिरात

 

कोल्हापुरात रविवारी राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद

schedule17 Jun 26 person by visibility 35 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे २१ जून २०२६ रोजी कोल्हापुरात ‘राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद’आयोजित केली आहे.दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सकाळी अकरा वाजता परिषदेला प्रारंभ होईल. या परिषदेसाठी उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील कुर्मी समाज प्रदेश उपाध्यक्ष कैलास पटेल, लखनौ येथील डॉ. डी.के. वर्मा, जे. एन. कटियार, राजेश कुमार, कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. पदमा पाटील, धारवाड येथील डॉ. माधुरी चौगुले उपस्थित राहणार आहेत . या परिषदेतून वेगवेगळया राज्यात शाहू कार्याविषयी नेमकी स्थिती व त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा हा उद्देश असल्याचे निमंत्रक वसंतराव मुळीक, सहनिमंत्रक बबन रानगे, सचिव संजय कांबळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शशिकांत पाटील, डी. जी. भास्कर, कादर मलबारी, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes