शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे १९ विद्यार्थी यशस्वी
schedule17 Jun 26 person by visibility 24 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: शिवाजी विदयापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामधील १९ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह सरळसेवा भरतीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक पदापासून ते आरोग्य सेवकापर्यंतची पदे या विद्यार्थ्यांनी मिळविली आहेत. यातील काही जणांची तर तीन-तीन पदांवर निवड झाली आहे. ही माहिती केंद्राच्या समन्वयक डॉ. कविता वड्राळे यांनी दिली.
महाराष्ट्र लोक सेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये धनाजी शेळके ( पोलीस उपनिरीक्षक), महेश साळुंखे (पोलीस उपनिरीक्षक), अतुल मानकर (राज्य् कर निरीक्षक), सुहेल मुल्ला ( कर सहाय्यक), कल्पक चिले, ( कर सहाय्यक), सुरज कांबळे, (महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली, कालवा निरीक्षक, जलसंपदा विभाग व आरोग्य विभाग), पंकज पाटील (आरोग्य सेवक, जिल्हा परिषद, सातारा), दिनेश साबळे ( सिव्हील इंजिनियर असिस्टंट, जलसंपदा विभाग, सातारा) कुणाल दैव (तलाठी, सांगली), सुनिल कांबळे, (कालवा निरीक्षक, जलसंपदा विभाग), प्राजक्ता पाटील (मोजणीदार, जलसंपदा विभाग), रोहित पाटील (रेल्वे बोर्ड, ट्रॅक मेन्टेनर), पंकज खंबाईत (तलाठी, नाशिक), शिवराज पाटील (कार्यकारी सहाय्यक, मुंबई महापालिका), ओंकार रणदिवे (फायर ब्रिगेड, मुंबई महापालिका), नितीन वळवी, (लॅब अटेंडंन्ट, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज), राकेश लोहार, (लॅब अटेंडन्ट, गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज), अनिल टेंगले, (आरोग्य सेवक, आरोग्य विभाग), संदेश साठे (पवित्र पोर्टल, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद, सातारा).
या सर्व यशस्वी विदयार्थ्यांना शिवाजी विदयापीठातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून ३० जूनपर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ. वड्राळे यांनी केले आहे.