Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जीमवर कारवाई, लॉजिंग व्यवस्थापनला नोटीस...तर गप्प बसणार नाही, कोल्हापुरात काँग्रेसच्या नगरसेवकांचा महायुतीला इशारातेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत राजर्षी शाहू स्पोर्ट्स, ताराराणी विद्यापीठ स्पोर्ट्स विजयी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधीरेडिओलॉजिस्ट डॉ. सुनील कुबेर यांचे निधनशिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी प्राचार्य संजय सावंतकोल्हापूर जिल्हा नेत्ररोग तज्ज्ञ संघटनेतर्फे शनिवारी विद्यापीठात रॅलीसाहित्यिक शंकर खंडू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापुरात शंकरपट सांस्कृतिक कार्यक्रमडाॅ.दिग्विजय पवार यांचा मलेशियात पुरस्काराने गौरवविजय टिपुगडे यांच्या चित्रांचे तरंगायन प्रदर्शन शनिवारपासून

जाहिरात

 

रेडिओलॉजिस्ट डॉ. सुनील कुबेर यांचे निधन

schedule13 Nov 26 person by visibility 123 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन : दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी,कोल्हापूरच्या नियामक मंडळाचे विद्यमान चेअरमन, माजी विद्यार्थी संघाचे विद्यमान उपाध्यक्ष, प्रायव्हेट हायस्कूलचे माजी विद्यार्थी कोल्हापूरातील राजारामपुरी येथील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. सुनील कुबेर यांचे शुक्रवारी ( तेरा नोव्हेंबर 2026) पहाटे अल्पशा आजाराने  निधन झाले. डॉ.  कुबेर हे प्रायव्हेट हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते.तसेच दि प्रायव्हेट एज्युकेशन संस्थेच्या माजी विद्यार्थी संघामध्ये गेली 22  वर्षे सक्रीयपणे कार्यरत होते. दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या नियामक मंडळात गेली अनेक वर्ष त्यांनी सदस्य म्हणून मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. कुबेर यांनी गेल्या काही वर्षांपासून संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. संस्थेच्या कार्याच्या विस्तारासाठी तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी  मोलाचे योगदान दिले. राजारामपुरी येथे सातव्या गल्लीत व्यंकटेश क्लिनिक मध्ये गेली अनेक वर्षे ते प्रख्यात रेडिओलॉजिस्ट म्हणून रुग्णसेवा करीत होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes