Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जीमवर कारवाई, लॉजिंग व्यवस्थापनला नोटीस...तर गप्प बसणार नाही, कोल्हापुरात काँग्रेसच्या नगरसेवकांचा महायुतीला इशारातेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत राजर्षी शाहू स्पोर्ट्स, ताराराणी विद्यापीठ स्पोर्ट्स विजयी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधीरेडिओलॉजिस्ट डॉ. सुनील कुबेर यांचे निधनशिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी प्राचार्य संजय सावंतकोल्हापूर जिल्हा नेत्ररोग तज्ज्ञ संघटनेतर्फे शनिवारी विद्यापीठात रॅलीसाहित्यिक शंकर खंडू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापुरात शंकरपट सांस्कृतिक कार्यक्रमडाॅ.दिग्विजय पवार यांचा मलेशियात पुरस्काराने गौरवविजय टिपुगडे यांच्या चित्रांचे तरंगायन प्रदर्शन शनिवारपासून

जाहिरात

 

तेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत राजर्षी शाहू स्पोर्ट्स, ताराराणी विद्यापीठ स्पोर्ट्स विजयी 

schedule13 Nov 26 person by visibility 113 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी :  कोल्हापुरातील प्रॅक्टिस फुटबॉल क्लब शतक महोत्सव वर्ष साजरे करीत आहे.  यनिमित्त सुरु प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्यावतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूर  सुरु असलेल्या येथे  १३ वर्षाखालील मुला मुलींच्या फुटबॉल संघांच्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुलींच्या संघांचे दोन आणि मुलांच्या संघांचे ४ सामने खेळवण्यात आले.
यामध्ये पहिला मुलांच्या संघाचा सामना विश्व फुटबॉल संघ विरुद्ध एस. एफ. एक्स क्लब यांच्यात झाला.
  या सामन्यात दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे बरोबरीत सुटला. दुसरा सामना राजर्षी शाहू स्पोर्ट्स विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय यांच्यात झाला. मध्यन्तरापर्यंत राजर्षी शाहू स्पोर्ट्सने दोन गोलची आघाडी घेतली. पहिला गोल शिवराज तांगडे दुसरा गोल इंद्र सावंत तर मध्यन्तरानंतर य तिसरा गोल स्वराज भोसले खेळाडूंने नोंदवला. छत्रपती शाहू विद्यालय संघाने केवळ एक गोल केला. हा सामना राजर्षी शाहू स्पोर्ट्सने तीन- एक गोल फरकाने जिंकला. 
मुलींच्या संघाचा सामना पोद्दार इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध ताराराणी विद्यापीठ फुटबॉल क्लब यांच्यात झाला. मध्यन्तरापर्यंत शून्य गोल बरोबरीत असलेल्या या सामन्यात मध्यन्तरानंतर ताराराणी विद्यापीठ फुटबॉल क्लबने एक गोल केला आणि एक-शून्य  गोलफरकाने  सामना जिंकला.
चौथा सामना सेंट झेव्हीयर हायस्कुल विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय या मुलींच्या संघात झाला.
 आजच्या सामन्यात आरव संदीप पाटील, आर्यन अभिजित पाटील, तनिष्का उमेश सरगर हे 'लढव्यया खेळाडू' ठरले त्यांचा मान्यवारांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव राजेंद्र दळवी, अभिजित वाणिरे राष्ट्रीय खेळाडू,ओंकार जाधव,मल्हार चव्हाण  उपस्थित होते.  यावेळी प्रॅक्टीस फुटबॉल क्लबचे उपाध्यक्ष संतोष महाडिक,  सचिव रमेश मोरे, सदस्य चंद्रशेखर देशपांडे, विजयराव जाधव, राजेंद्र वायचळ, मारुती सावंत, अनिल महाजन, उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes