Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाडमहापालिका निवडणूक - राजकारणातून मला बदनाम करण्याचा घाट - सुशांत पोवारसचिन शिरगावकर यांना उद्योगरत्न पुरस्कार, डॉ. आनंद देशपांडेंच्या हस्ते गुरुवारी वितरण समारंभकोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडेअंबाबाई मंदिर आराखड्यातील भूसंपादनासाठी योग्य मोबदला मिळणार; कोणावरही अन्याय होणार नाहीसहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्र   शिक्षणाधिकारी मीना शेंडकरांच्या कामकाजाच्या चौकशीचा अहवाल सीईओंकडे सादर, ३८ पानी अहवालप्राथमिक शिक्षणाधिकारीपदी अशोक घुगे रुजूगोकुळचा दूध वाढ गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, गावनिहाय पाच वर्षाचे मायक्रो प्लॅनिंग

जाहिरात

 

अंबाबाई मंदिर आराखड्यातील भूसंपादनासाठी योग्य मोबदला मिळणार; कोणावरही अन्याय होणार नाही

schedule17 Aug 26 person by visibility 67 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘ करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनातील बाधित नागरिकांना योग्य मोबदला दिला जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही. मंदिर परिसर विकास आराखडा राबवताना करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी सर्वांनी सहकार्य करावे. मंदिर परिसरातील बाधित नागरिकांना जागेसाठी योग्य मोबदला देण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्याबाबत विचार करण्यात येईल.’ असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. 

 करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान मंदिर व परिसर विकास आराखडा राबवत असताना प्रस्तावित भूसंपादनाशी निगडीत नागरिक, व्यापारी, नगरसेवक, श्रीपूजक यांच्यासोबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक किरण नकाते, अजित ठाणेकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण केले. मंदिर परिसराचा विकास आराखडा राबवताना भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विकास आराखड्यामध्ये ३६० मिळकतींचे भूसंपादन करणे आवश्यक असून यातील ८९ मिळकती निवासी, १९५ वाणिज्य, तर ५३ मिळकती संयुक्त आहेत. मिळकतपत्रिकेवरील जमिनीचे क्षेत्र २८ हजार  ५८ चौरस मीटर आहे. खाजगी मालकी असणाऱ्या १९ हजार ४८९ चौरस मीटर क्षेत्राबाबत भूसंपादन प्रक्रिया राबवण्याबाबत विचार झाला आहे. तसेच या आराखडा अंतर्गत दर्शन रांग, दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी पार्किंग, वाणिज्य संकुलांचा विचार करुन दुकान गाळे, अन्नछत्र, मंदिर कार्यालय, ॲम्पीथिएटर, स्वच्छतागृह, हेरिटेज प्लाझा, लॉकर्स, चप्पल स्टॅन्ड व अन्य आवश्यक सुविधांचा विचार या विकास आराखड्यामध्ये करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिली.   मंदिर परिसरातील बाधित होणाऱ्या सदनिका व गाळे मालकांनी आराखड्याबाबत काही सूचना करून हा आराखडा राबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.    

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes