Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आंदोलनावरुन आंदोलन, गोकुळ आवारातून कर्मचाऱ्यांनी केले वांगचूकांचे समर्थन,  भाजपाचा जोरदार आक्षेपशक्तीपीठ रद्द करा, अन्यथा जनताच सरकारचा शक्तीपात करेल ! पंढरपुरात संघर्ष समितीतर्फे सद्बुद्धी दिंडी ! !कुलगुरू भेटीला, साहित्यिक भारावलेआयटीआयमध्ये रोजगार मेळावा, तीस जणांची निवडहरित शिरोलीसाठी कारखानदार सरसावले, स्मॅक भवन परिसरात १२५ देशी वृक्षांचे रोपणस्वप्नांना आकार देणारे करिअर म्हणजे वास्तुकला – डॉ. ए. के. गुप्ता अध्यक्ष, सीईओ, सभापतींची शाळेपर्यत धाव ! विद्यार्थिनींच्या प्रकृतीची घेतली माहिती ! !कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राला जागतिक भरारीचे पंख! कोल्हापुरातील आयटी कंपन्या करणार अमेरिकेला सॉफ्टवेअरसह इतर सेवा निर्यात ! !सूरज साखरेवरील गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटकपृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जाहिरात

 

 अध्यक्ष, सीईओ, सभापतींची शाळेपर्यत धाव ! विद्यार्थिनींच्या प्रकृतीची घेतली माहिती ! !

schedule18 Jul 26 person by visibility 413 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील राजर्षी शाहू निवासी प्रशालेतील विद्यार्थिनींच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव यांनी शाळेत धाव घेतली. या शाळेतील सहा विद्यार्थिनींना उंदराने चावल्याची घटना घडली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत अध्यक्षा खोत व सभापती यादव यांनी प्रशालेला भेट देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, आरोग्यविषयक उपाययोजना तत्काळ करण्याच्या सक्त सूचना केल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी जॅसमिन यांनी सकाळी भेट देऊन पाहणी केली. जवळपास दोन तास त्या शाळा परिसरात थांबून सगळी माहिती घेतली. आवश्यक त्या सूचना केल्या. तर अध्यक्षा खोत व सभापती यादव यांनी दुपारच्या सत्रात भेट देऊन विद्यार्थिनींच्या प्रकृतीची माहिती घेतली. या प्रशालेतील त्रुटी दूर कराव्यात. शाळा व होस्टेल परिसरात स्वच्च्छता राबविण्याच्या सूचना केल्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांची सुरक्षितता व आरोग्यविषयक उपाययोजनेत हलगर्जीपणा केल्यास कारवाई होईल असेही स्पष्टपणे बजावले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes