Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आंदोलनावरुन आंदोलन, गोकुळ आवारातून कर्मचाऱ्यांनी केले वांगचूकांचे समर्थन,  भाजपाचा जोरदार आक्षेपशक्तीपीठ रद्द करा, अन्यथा जनताच सरकारचा शक्तीपात करेल ! पंढरपुरात संघर्ष समितीतर्फे सद्बुद्धी दिंडी ! !कुलगुरू भेटीला, साहित्यिक भारावलेआयटीआयमध्ये रोजगार मेळावा, तीस जणांची निवडहरित शिरोलीसाठी कारखानदार सरसावले, स्मॅक भवन परिसरात १२५ देशी वृक्षांचे रोपणस्वप्नांना आकार देणारे करिअर म्हणजे वास्तुकला – डॉ. ए. के. गुप्ता अध्यक्ष, सीईओ, सभापतींची शाळेपर्यत धाव ! विद्यार्थिनींच्या प्रकृतीची घेतली माहिती ! !कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राला जागतिक भरारीचे पंख! कोल्हापुरातील आयटी कंपन्या करणार अमेरिकेला सॉफ्टवेअरसह इतर सेवा निर्यात ! !सूरज साखरेवरील गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटकपृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जाहिरात

 

आयटीआयमध्ये रोजगार मेळावा, तीस जणांची निवड

schedule18 Jul 26 person by visibility 40 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात १९ उद्योजकांनी एकूण ४६८ रिक्त पदे अधिसूचित केली होती. मेळाव्यास ३०१ उमेदवार उपस्थित राहिले. त्यापैकी २२१ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. १४१ उमेदवारांची प्राथमिक, तर ३० उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.

खासदार धनंजय महाडिक अध्यक्षस्थानी होते. आमदार अमल महाडिक, भाजप महानगर अध्यक्ष विजय जाधव, रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष तथा समन्वयक संजय पेंडसे, राजवर्धन जगदाळे, भरत सोमैय्या, हरिश्चंद्र धोत्रे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी युवराज पाटील, आयटीआयचे प्राचार्य महेश आवटे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम उपस्थित होते. सहायक आयुक्त जमीर करीम यांनी रोजगार मेळाव्याचे महत्त्व स्पष्ट करत स्वयंरोजगाराच्या विविध संधी तसेच इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ ची माहिती दिली. प्राचार्य महेश आवटे यांनी आयटीआयमधील ३१ विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती दिली. 

रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष संजय पेंडसे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या हजारो रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आमदार अमल महाडिक यांनी तरुणांनी स्थानिक रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, तसेच भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले. खासदार महाडिक यांनी बदलत्या रोजगार बाजारपेठेतील कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शॉर्ट टर्म कोर्सेसद्वारे देश-विदेशात रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन करत तरुणांनी रोजगार शोधणारे न राहता रोजगार निर्माण करणारे बनावे, असे आवाहन केले. आयटीआयचे निदेशक ए. पी. कांबळे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes