Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आंदोलनावरुन आंदोलन, गोकुळ आवारातून कर्मचाऱ्यांनी केले वांगचूकांचे समर्थन,  भाजपाचा जोरदार आक्षेपशक्तीपीठ रद्द करा, अन्यथा जनताच सरकारचा शक्तीपात करेल ! पंढरपुरात संघर्ष समितीतर्फे सद्बुद्धी दिंडी ! !कुलगुरू भेटीला, साहित्यिक भारावलेआयटीआयमध्ये रोजगार मेळावा, तीस जणांची निवडहरित शिरोलीसाठी कारखानदार सरसावले, स्मॅक भवन परिसरात १२५ देशी वृक्षांचे रोपणस्वप्नांना आकार देणारे करिअर म्हणजे वास्तुकला – डॉ. ए. के. गुप्ता अध्यक्ष, सीईओ, सभापतींची शाळेपर्यत धाव ! विद्यार्थिनींच्या प्रकृतीची घेतली माहिती ! !कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राला जागतिक भरारीचे पंख! कोल्हापुरातील आयटी कंपन्या करणार अमेरिकेला सॉफ्टवेअरसह इतर सेवा निर्यात ! !सूरज साखरेवरील गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटकपृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जाहिरात

 

हरित शिरोलीसाठी कारखानदार सरसावले, स्मॅक भवन परिसरात १२५ देशी वृक्षांचे रोपण

schedule18 Jul 26 person by visibility 37 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक), गार्डन्स क्लब, कोल्हापूर आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोली औद्योगिक क्षेत्रातील स्मॅक भवन परिसरात वृक्षारोपण अभियान राबविले. पर्यावरण संवर्धन, हरित औद्योगिक परिसर निर्मिती आणि भावी पिढ्यांसाठी हिरवागार वारसा जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या अभियानात पिंपळ, वड, करंज, पारिजातक, बकुळ, अर्जुन, कदंब, कडुनिंब, कांचन, कैलासपती, गुळभेंडी आदी १२५ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमास कुंभी कासारी सहकारी बँकेचे अध्यक्ष अजित नरके शिल्पा नरके यांची प्रमुख उपस्थिती लाभलीस्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून  उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्मॅक तर्फे गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर व नरके यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण प्रतिज्ञा घेतली तसेच "जय वसुंधरा" हा घोष देत पर्यावरण संरक्षणाचा निर्धार व्यक्त केला

या उपक्रमासाठी शिल्पा नरके, कीर्तीकुमार शेंडगे, वर्षा वायचळ, रजनी जाधव आणि पारितोष उरकुडे यांनी सहकार्य केले. चारुता शिंदे यांनी स्वागत केले. ग्रीन क्रेडिट उपक्रमांतर्गत लागवड करण्यात आलेल्या सर्व वृक्षांचे संवर्धन गार्डन्स क्लब स्मॅक करणार आहे कार्यक्रमास एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय. . नाईक, स्मॅकचे संचालक राजू पाटील, अतुल पाटील, स्वीकृत संचालक भीमराव खाडे, निमंत्रित सदस्य मोहन जाधव, विनय लाटकर, गार्डन्स क्लबचे अविनाश शिरगावकर, सुरेश शिपूरकर, कृपेश हिरेमठ, रवींद्र साळुंखे, कल्पना थोरात, रेणुका वाधवानी, संगीता सावर्डेकर, सुषमा शेवडे, मयूर पाटील, निशिगंधा कुलकर्णी, पूजा सावंत, स्नेह भुर्के, अनिता गाडवे, कीर्ती कोराणे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes