प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा ३५५ केंद्रावर
schedule01 Mar 26 person by visibility 18 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागमार्फत रविवारी, एक मार्च रोजी बॅ. बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा इयत्ता ४ थी व ७ वी या वर्गांसाठी आयोजित केली होती. जिल्हयातील ३३५ केंद्रावर झाली. अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली.
चाळणी परीक्षेतून तालुक्यातून गुणानुक्रमे मराठी चौथीथी चे 200 विद्यार्थी व ७ वीचे १०० विद्यार्थी व उर्दू माध्यमाचे १०० विद्यार्थी निवड परीक्षेसाठी पात्र होतील. उपरोक्त परीक्षा सुरळीत पार पाडण्याकरीता ३५५ केंद्र संचालकांची नियुकती करणेत आली होती. परीक्षा कामकाज जिल्हयात सुरळीत होणेसाठी तालुका व जिल्हास्तरावरून गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रसंचालक व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
परीक्षेकरीता कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील परीक्षा विभाग प्रमुख रत्नप्रभा दबडे विस्तार अधिकारी (शिक्षण), शशिकांत बडे, उपशिक्षणाधिकारी, आर. व्ही. कांबळे, आर. वाय. ठोकळ, विस्तार अधिकारी (शिक्षण) डी.एच. पाटील, कनिष्ठ सहाय्यक तसेच प्रश्नपत्रिका निर्मिती कामकाज पाहणारे सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने परीक्षा सुरळीत पार पडली.