Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सांगली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार संवादिका पुस्तिकाविवेकानंद कॉलेजमध्ये विवेक वार्षिक अंकाचे प्रकाशनखासगी क्लासेस-लॉजिंगसह दुकानांची तपासणी होणार, आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेशसेवा ज्येष्ठ शिक्षकांवरील अन्यायविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, सीईओंना निवेदनगोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे शक्तीप्रदर्शन, ३२४ ठराव दाखलगोकुळच्या निवडणुकीत संचालकपदाच्या चार जागा, एक वर्ष चेअरमनपद हवे- आमदार शिवाजीराव पाटील भाजपचे 1431 ठराव ! गोकुळच्या संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ !! खासदार धनंजय महाडिकगोकुळमध्ये अरुण नरके गट भाजपसोबत,  महाडिकांशी दोस्ताना कायमशहीद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरामहात्मा फुले विद्यालयात हॅप्पी डिजिटल क्लासरुम, मॉडेल स्कूलसाठी प्रयत्नशील

जाहिरात

 

कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे निमशिरगावमध्ये शंभरहून अधिक वृक्षांची लागवड

schedule29 Jun 26 person by visibility 34 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पर्यावरण संवर्धन, सामाजिक उत्तरदायित्व आणि श्रमसंस्कार यांचा सुंदर संगम घडवत कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे निमशिरगाव येथे उभारण्यात येत असलेल्या देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार स्मारक व संविधान संकुल परिसरात वृक्षारोपण व श्रमदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात झाले. परिसरात शंभरहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली.

 आंबा, उंबर, फणस, बदाम, पिंपळ यांसह विविध देशी व पर्यावरणपूरक वृक्षांच्या रोपांचे रोपण करून भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपण्याचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी, ‘पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी,’ असे आवाहन केले. या उपक्रमात देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर आदी संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एनएसएस व एनसीसीचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी सहभागी झाले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes