कोल्हापुरात ढगफुटीसदृष्य पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी
schedule12 Jun 25 person by visibility 125 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटासह कोल्हापुरात गुरुवारी (१२ जून २०२५) सायंकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. जवळपास अर्धा तास पावसाने कोल्हापूर आणि परिसराला झोडपून काढले. गटारी व नाले भरुन पावसाचे पाणी रस्त्यावर पसरले. सखल भागात आणि रस्त्यावर पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले. ढगफुटीसदृश्य पावसामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. साडे चार वाजण्याच्या जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट होता. जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणी साचले. शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरले. झाडाच्या फांद्या मोडून वाहनावर पडल्याने दुचाकी व चारचाकीचे नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे फेरीवाले, विक्रेत्यांची तारांबळ उडाली. वीज पुरवठाही काही वेळ खंडित करण्यात आला होता. सव्वा पाचनंतर पावसाचा जोर ओसरला.