Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भरमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारीगोकुळसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, तीन माजी चेअरमन, बारा संचालकांना उमेदवारी  पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार हर्षदा देशमुख -जाधवराधानगरीत राष्ट्रवादीत फूट, प्रा. किसन चौगले  काँग्रेसकडे ! समविचारी आघाडीतून उमेदवारी ! !नाना आगळा - नाना वेगळा…नाना जीवाभावाचा !!मुश्रीफसाहेब मला खाणार आहेत की ? मी त्यांना खाणार आहे ? आमदार शिवाजी पाटलांचे धडाकेबाज विधानमहायुतीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी दहा वाजता जाहीर होणार, मंत्री मुश्रीफ करणार नावांचे ट्विटगोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!

जाहिरात

 

नाना आगळा - नाना वेगळा…नाना जीवाभावाचा !!

schedule08 Oct 26 person by visibility 443 categoryसामाजिक

आप्पासाहेब माळी, माळी  महाराष्ट्र न्यूज वन -: तो परखड…तो स्पष्टवक्ता….तो सडेतोड…तो भूमिका जिवंत साकारण्यासाठी जीवतोड मेहनत करणारा… कुणाची भीडभाड न ठेवता जे पोटात ते ओठावर आणणारा…कसदार अभिनय करणारा...हाडाचा कलाकार… निसर्गात रमणारा…पडदा गाजविणारा…रंगभूमी दणाणून सोडणारा… सामाजिक भान जपणारा...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू पुसण्यासाठी धाव घेणारा...नाम फाऊंडेशनमार्फत मदतीचा हात देणारा... भारदस्त आवाजाचा आणि संवेदनशील मनाचा... व्यक्ती एक रुपे अनेक…म्हणजे अभिनेता नाना पाटेकर…! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजविलेला अस्सल मराठमोठा कलावंत. जणू अभिनयाचा सम्राट. वयाच्या ७५ व्या वर्षी गोवामधील डोना पावला येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेमा आणि मराठी रंगभूमीवरचा अभिनयाचा एक अंगार निखळला. नाना पाटेकर यांचा कोल्हापूरशी जिव्हाळयाशी संबंध होता. अनेकांशी स्नेह होता. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या कोल्हापूरच्या असंख्य आठवणी जोडल्या आहेत. पत्रकार या नात्याने त्यांना अनेकदा भेटणं झाले. त्यांच्यासोबत नाष्टा करण्याचा योग आला. पत्रकार परिषद, कार्यक्रमाचे वृत्ताकंन करताना बोलणं झाले. प.त्रकार परिषद असो की कार्यक्रम…नानाचा जिंदादिल स्वभाव, बिनधास्त वावर….नजरेत भरायचा…हे सारे प्रसंग फ्लॅशबॅक स्वरुपात डोळयासमोर तरळू लागले…

पत्रकार म्हणून काम करताना नाना पाटेकर यांना अनेकदा भेटण्याचा योग आला. पण तो सिनेमाच्या पडद्यावरुन कॉलेज जीवनापासूनच खुणावत होता. प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नंतर सर्वसामान्य माणसांच्या अंगातील धग पडद्यावर जळजळीतपणे मांडणारा दुसरा कलावंत म्हणजे नाना पाटेकर…त्याच्या सिनेमातील संवाद हे कॉलेज जीवनात तोंडपाठ झालेले. तिरंगामधील राजकुमार सोबतची त्याची संवादाची जुगलबंदी तर अफलातून. भूमिक कोणतीही असो ती साकारावी नानानीच. असं आपसूक वाटायच…‘साला आंडू पांडू समझ रखा है क्या…मराठा है…मराठा मारता है या मरता है... ' असो की साला एक मच्छर आदमी को...’, "असे  डायलॉग तर प्रचंड गाजलेली. नाना पाटेकर पडद्यावर दिसतो म्हणून केवळ त्याच्यासाठी सिनेमा पाहायचं. ‘तिरंगा, क्रांतिवीर…हम दोनो…खामोशी द म्युझिकल…यशवंत, हुतूतू…अग्निसाक्षी…अपहरण…परिंदा’असे अनेक सिनेमे. मराठीतील ‘पक पक पकाक…नटसम्राट... प्रत्येक भूमिका नानाने गाजवली. एन चंद्रा दिग्दर्शित व नाना पाटेकर अभिनित 'अंकुश…'खूप उशिरा पाहिलेला…पण प्रत्येक ठिकाणी नाना छा गये…

कोल्हापुरात पत्रकार म्हणून नाना पाटेकरांना भेटण्याचा योग आला. त्यांनी एकदा, गायन समाज देवल क्लबला भेट दिली. गायन समाज देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्रभाकर वर्तक यांच्यासोबत गायन समाज देवल क्लबची पाहणी केली. यावेळी माझ्यासोबत छायाचित्रकार राजा उपळेकर होते. देवल क्लबची पाहणी झाल्यानंतर आम्ही काही जण त्यांना भेटलो. छोटीशी पत्रकार परिषद झाली. गायन समाज देवल क्लबसाठी त्यांनी मदतीचा हात देऊ अशी हमी दिली. मग अनौपचारिक गप्पा रंगल्या. नानाही मोठेपणा, स्टारडम विसरुन साऱ्यांसोबत गप्पा मारल्या. त्याप्रसंगी मी, त्यांना शेकहँड दिला. शेकहँड करताना मी, जोराने हात दाबला…तेव्हा क्षणाचीही उसंत न घेता नाना म्हणाला…‘अरे, तू मला ताकत दाखवतोस…बघ आता माझी ताकत’असे म्हणत जोराने हात दाबला. दुसऱ्याच क्षणाला जवळ घेत मिठी मारली.

नानाला एकदा दुधाळी  रेंज येथील कार्यक्रमादरम्यान भेटता आले. त्यांनी रेंजच्या सुविधेसाठी निधी जाहीर केल्याचे आठवते. दुधाळी रेंज येथील कार्यक्रम झाल्यानंतर हॉटेल व्हिक्टर पॅलेस येथे पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेतही त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी पत्रकारांनी, आता तुमचा पुढचा प्लॅन् काय आहे ? अशी विचारणा केली. नानाने थोडा पॉझ घेतला. आणि म्हटलं…हा पुढचा प्लॅन मोठा केला आहे…साऱ्यांचेच कान टवकारले. नानांनी पुन्हा पॉझ घेतला…आणि अगदी सहजपणे...’पत्रकार परिषद संपली की मस्तपैकी झोप काढणार….हाच तर सध्याचा पुढचा प्लॅन…’असे म्हणताच उपस्थितांची हसता हसता पुरेवाट झाली.

विजयदुर्ग महोत्सवला नाना पाटेकर यांची उपस्थित असायची. राजीव परुळेकर, चारुदत्त जोशी यांच्यासोबत त्यांची चर्चा असायची. विजयदुर्ग महोत्सवसाठी जात असताना एका वर्षी त्यांनी सकाळी कोल्हापुरात काही पत्रकारांसोबत नाष्टयाचा बेत केला. ‘बी न्यूज्’चे संपादक चारुदत्त जोशी यांच्या राजारामपुरी आठवी नववी गल्ली येथील निवासस्थानी सकाळी  -सकाळी हा योग आला. तेव्हाही जवळपास दीड तास ते पत्रकारांसोबत गप्पा मारत होते. त्यावेळी हिंदीतील काही कलाकार दुबईमधील शोमध्ये सहभागी झाल्याचे प्रकरण गाजत होते. त्या अनुषंगाने प्रश्न केला. तेव्हा नाना पाटेकर ताडकन उठले…बंदुक रोखल्यासारखे बोट रोखत म्हणाले, ’तुझ्या डोक्यावर कोणी गनपट्टी ठेवली तर तू काय करणार…’अशी विचारणा केली. ’अरे ती कलाकार मंडळी आहेत….कला सादर करुन असतील. त्यांना बाकीच्या गोष्टीत ओढू नका…’अशा शब्दांत भूमिका मांडली.

 चंद्रकांत मांडरे कला अकादमीतर्फे संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृह येथे नाना पाटेकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. संध्याकाळी सातला सुरु झालेला हा कार्यक्रम जवळपास तीन तास चालला. श्रीमती शशिकला मांडरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार झाला. एक सत्कार हा वेगळा होता. सफाई काम करणाऱ्या महिलेचा सत्कार. सभागृह तुडुंब् भरलेले. व्यासपीठावर मान्यवर मंडळी…नाना पाटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार होता…सफाई कामगार महिला व्यासपीठावर आल्या…सत्कार स्वीकारला….त्या नमस्कार करण्यासाठी पुढे येणार तोपर्यंत नाना पटकन पुढे झाला आणि त्यांनी त्या सफाई कामगार महिलेला वाकून नमस्कार केला….आणि सार्वजनिक आरोग्यात सफाई कामगारांच्या कामगिरीचे कौतुक केलं…या अनपेक्षित घटनेनं सारे सभागृह स्तब्ध झाले…संपूर्ण सभागृह उभे राहिले…टाळयांचा कडकडाट झाला…हा सन्मान त्या महिलेचा असे सूचन करत नाना आसनस्थ झालानाना आगळा….नाना वेगळा….अनेकांसाठी जीवाभावाचा…! प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीत यांच्यासाठी त्यांनी म्हटलेल्या….‘तुम्हे कैसे बताऊ तुम मेरे लिए कौन हो, ’याच त्याच भावना रसिक प्रेक्षकांच्या नानाबद्दल असतील.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes