Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भरमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारीगोकुळसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, तीन माजी चेअरमन, बारा संचालकांना उमेदवारी  पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार हर्षदा देशमुख -जाधवराधानगरीत राष्ट्रवादीत फूट, प्रा. किसन चौगले  काँग्रेसकडे ! समविचारी आघाडीतून उमेदवारी ! !नाना आगळा - नाना वेगळा…नाना जीवाभावाचा !!मुश्रीफसाहेब मला खाणार आहेत की ? मी त्यांना खाणार आहे ? आमदार शिवाजी पाटलांचे धडाकेबाज विधानमहायुतीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी दहा वाजता जाहीर होणार, मंत्री मुश्रीफ करणार नावांचे ट्विटगोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!

जाहिरात

 

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार हर्षदा देशमुख -जाधव

schedule08 Oct 26 person by visibility 110 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने माझ्यासारख्या नव्या चेहऱ्यावर विश्वास ठेवून या निवडणुकीत संधी दिली आहे. या संधीचे निश्चितच सोने करून पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्यास मी कटिबद्ध आहे. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही निवडणूक ताकदीने लढवून विजय मिळवू.‘ असा विश्वास महाविकास आघाडीच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीतंर्गत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून हर्षदा देशमुख यांनी तर शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर पुणे येथे प्रचार मेळावा झाला. या सभेला मोठी गर्दी हाती.  राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘हर्षदा देशमुख यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेली गर्दी ही विजयाची नांदी आहे. शिक्षक, पदवीधर, एमपीएससी विद्यार्थी आणि तरुण मतदारांशी सातत्याने संवाद साधून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक असून प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने कामाला लागावे.’  आमदार सतेज पाटील, आमदार विश्चजीत कदम,  शितलदेवी मोहिते-पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच इंडिया आघाडीला अधिक बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes