Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्राथमिक दूध संस्थांच्या न्यायासाठी गोकुळच्या संचालकांनी ठोकला शडडूजिल्हा परिषदेची सत्ता लाडक्या बहिणींच्या हाती ! सहापैकी पाच पदावर महिला !!-शिक्षक पात्रता परीक्षा एकवीस जूनला, आवेदनपत्र भरण्याची मुदत सोळा एप्रिलपर्यंतआयटी. पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर, औद्योगिक विकास महामंडळाने भरले ५ कोटी ६० लाखनिलंबित कर्मचाऱ्यांच्यावर लाखो रुपयांचा खर्च, महापालिका त्यांना फुकट का पोसते ? नगरसेवकांचा सभागृहाला सवालजिप समिती सभापतिपदासाठी नावे घोषित ! सारिका नांदेकर, शीतल यादव विद्या पाटील, श्रद्धा गायकवाड !!पाटाकडील तालीम मंडळाने जिंकली चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा ! खंडोबा तालीम मंडळ उपविजेता !!कोल्हापूर-नवी मुंबई ! इंडिगो एअरलाईन्सची दिवसातून दोन वेळा विमान सेवा !!निरोगी आरोग्यासाठी होमिओपॅथीसुध्दा सक्षम पर्याय - डॉ. धर्मेंद्र शर्मा संचालक म्हणून आम्ही प्राथमिक दूध संस्थांच्या पाठीशी, अदृश्य शक्तीचा डाव उधळून लावू- नविद मुश्रीफ

जाहिरात

 

जिप समिती सभापतिपदासाठी नावे घोषित ! सारिका नांदेकर, शीतल यादव विद्या पाटील, श्रद्धा गायकवाड !!

schedule30 Mar 26 person by visibility 899 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध समिती सभापतिपदासाठी नावे निश्चित झाली आहेत. महायुतीचे नेतेमंडळी व जिल्हा परिषद सदस्यांची सोमवारी, (३० मार्च २०२६ ) हॉटेल पॅव्हेलियन येथे बैठक झाली. या बैठकीत सभापतिपदासाठी नावे जाहीर झाली. दुपारी जिल्हा परिषदेची सभा आहे. त्या सभेत या निवडी होतील. दरम्यान बांधकाम व आरोग्य समिती सभापती पदासाठी शेवटपर्यंत रस्सीखेच  सुरू होती.

बांधकाम व आरोग्य समिती सभापतिपद शिवसेनेकडे आहे. शिवसेनेकडून या पदावर भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सारिका यशवंत नांदेकर  यांचे नाव निश्चित केले. जनसुराज्य शक्ती पक्षाला शिक्षण व अर्थ समिती सभापतिपद मिळाले आहे. जनसुराज्यकडून या पदावर हातकणंगले तालुक्यातील सदस्या शितल प्रवीण यादव यांचे नाव निश्चत केले.महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सदस्या चंदगड तालुक्यातील विद्या विलास पाटील यांना संधी मिळाली. समाजकल्याण समिती सभापतिपद राजर्षी शाहू आघाडीकडे आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीचे चार सदस्य आहेत. या आघाडीचे अब्दुललाट मतदारसंघातील सदस्या श्रद्धा गायकवाड यांची समाजकल्याण समिती सभापतिपदासाठी नाव निश्चित केले.

 बांधकाम व आरोग्य समिती सभापतिपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या मतदारसंघातील सदस्याला सभापतिपद मिळावे यासाठी आग्रह धरला होता. करवीर तालुक्यातील वडणगे मतदारसंघातील सदस्य इंद्रनील पाटील यांच्यासाठी आग्रही होते. शिवसेनेचे नेते व गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी आपल्या चिरंजीवला पद मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. पालकमंत्री आबिटकर हे आपल्या मतदारसंघातील सदस्याला पद मिळावे यासाठी आग्रही होते. शिवसेनेकडून सदस्य अरुण जाधव, सारिका नांदेकर, अर्चना निकम यांची नावे चर्चेत होती.

महिला व बालकल्याण समिती सभापतिपद राष्ट्रवादीकडे आहे. चंदगड तालुक्याला हे पद द्यायचे नेत्यांनी निश्चित केले. मात्र या पदासाठी रचना गावडे, विद्या पाटील, सायली भोगण यांची नावे चर्चेत होती. नेते मंडळीच्या चर्चेनंतर  विद्या विलास पाटील यांचे नाव निश्चित झाले. जिल्हा परिषदेच्या ६८ सदस्य संख्येपैकी महायुतीकडे ५१ सदस्यांचे भक्कम बहुमत आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अध्यक्षपद तर भारतीय जनता पक्षाला उपाध्यक्षपद आहे. राष्ट्रवादीचे एकूण सदस्य वीस आहेत, भाजपाचे बारा आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे सहा सदस्य तर शाहू आघाडीची सदस्य संख्या चार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes