Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्राथमिक दूध संस्थांच्या न्यायासाठी गोकुळच्या संचालकांनी ठोकला शडडूजिल्हा परिषदेची सत्ता लाडक्या बहिणींच्या हाती ! सहापैकी पाच पदावर महिला !!-शिक्षक पात्रता परीक्षा एकवीस जूनला, आवेदनपत्र भरण्याची मुदत सोळा एप्रिलपर्यंतआयटी. पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर, औद्योगिक विकास महामंडळाने भरले ५ कोटी ६० लाखनिलंबित कर्मचाऱ्यांच्यावर लाखो रुपयांचा खर्च, महापालिका त्यांना फुकट का पोसते ? नगरसेवकांचा सभागृहाला सवालजिप समिती सभापतिपदासाठी नावे घोषित ! सारिका नांदेकर, शीतल यादव विद्या पाटील, श्रद्धा गायकवाड !!पाटाकडील तालीम मंडळाने जिंकली चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा ! खंडोबा तालीम मंडळ उपविजेता !!कोल्हापूर-नवी मुंबई ! इंडिगो एअरलाईन्सची दिवसातून दोन वेळा विमान सेवा !!निरोगी आरोग्यासाठी होमिओपॅथीसुध्दा सक्षम पर्याय - डॉ. धर्मेंद्र शर्मा संचालक म्हणून आम्ही प्राथमिक दूध संस्थांच्या पाठीशी, अदृश्य शक्तीचा डाव उधळून लावू- नविद मुश्रीफ

जाहिरात

 

जिल्हा परिषदेची सत्ता लाडक्या बहिणींच्या हाती ! सहापैकी पाच पदावर महिला !!-

schedule30 Mar 26 person by visibility 276 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत यंदा, खऱ्या अर्थाने महिलाराज निर्माण झाले आहे. अध्यक्षपदापाठोपाठ चार समिती सभापतिपदी महिला सदस्यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेतील सहा पदाधिकांऱ्यापैकी पाच ठिकाणी महिला आहेत. यावरुन जिल्हा परिषदेची सत्ता लाडक्या बहिणींच्या होती एकवटल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सदस्या शिल्पा शशिकांत खोत यांची तर उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे सदस्य तानाजी पाटील यांची निवड झाली.अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यालयीन प्रवेश झाला. त्यानंतर चार समिती सभापती निवडीसाठी जिल्हा परिषद सदस्यांची सोमवारी, ३० मार्च २०२६ रोजी सभा झाली. पीठासन अधिकारी तथा प्रातांधिकारी मौसमी चौगले, तहसिलदार स्वप्नील पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू सभागृहामध्ये ही सभा झाली.

६८ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत महायुतीचे ५१ सदस्य आहेत. तर काँग्रेस आघाडीचे सदस्य संख्या १७ आहे. सभेत, बांधकाम व आरोग्य समिती सभापती, अर्थ व शिक्षण समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी महायुती व महविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले. दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई, सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांना महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे चारही समिती सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या.

बांधकाम व आरोग्य समिती सभापतिपदी  भुदरगड तालुक्यातील शिवसेनेच्या सदस्या सारिका यशवंत नांदेकर, शिक्षण व अर्थ समिती सभापतिपदी हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सदस्या शितल प्रवीण यादव, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी चंदगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सदस्या  विद्या विलास पाटील तर समाजकल्याण समिती सभापतिपदी शिरोळ तालुक्यातील राजर्षी शाहू आघाडीच्या श्रद्धा अविनाश गायकवाड यांची निवड झाली.

…………

सहा पदाधिकारीपैकी पाच महिला

जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांची संख्या सहा इतकी आहे. या अध्यक्षपदी शिल्पा खोत आहेत. चारही समिती सभापतिपदी महिला सदस्यांची निवड झाली. यामध्ये बांधकाम समिती सभापतिपदी सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापतिपदी शितल यादव, समाजकल्याण समिती सभापतिपदी श्रद्धा गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी विद्या पाटील यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील आहेत. यावरुन पदाधिकाऱ्यांच्या एकूण सहापैकी पाच ठिकाणी महिला सदस्य तर उपाध्यक्षपदी पुरुष सदस्य आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes