Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामावर उद्यापासून कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची  शंभर टक्के निकालाची परंपरा कायमब्राह्मण सभा करवीरतर्फे ग्रंथदिंडी, ४० वारकरी बालचमूंचा सहभागरोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे, सचिवपदी अविनाश चिकनीसअमित शहांच्या सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा, एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढले बाहेरभारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, एक- एक घुसखोर शोधून देशाबाहेर घालवू - अमित शाहअंबाबाई मंदिर विकास आराखडयामुळे धार्मिक पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळशहरात २२ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठाटीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्थाशिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटप

जाहिरात

 

निरोगी आरोग्यासाठी होमिओपॅथीसुध्दा सक्षम पर्याय - डॉ. धर्मेंद्र शर्मा

schedule29 Mar 26 person by visibility 239 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूरः निरोगी आरोग्यासाठी दुष्परिणाम विरहीत होमिओपॅथी औषध प्रणाली देखील सक्षम पर्याय होऊ शक्ते असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे येथील होमिओपॅथी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. धर्मेंद्र शर्मा यांनी केले. होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा) ने आयोजित केलेल्या 'होमेसाकॉन २०२६ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  परिषद होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, ताराराणी चौक वोल्हापूरच्या सभागृहामध्ये झाली . "निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य होमिओपॅथीसह” या संकल्पनेवर आधारीत परिषद पार पडली.
 "पारंपारिक उपचार पध्दतीनंतर होमिओपॅथीचाच वापर जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर असून भारत होमिओपॅथी चे जागतिक नेतृत्व करत आहे. होमिओपॅथीचा सार्वत्रिक आरोग्य सेवेमध्ये पारंपारिक उपचार पध्दती सोबत अंर्तभाव केल्यास सार्वजनिक आरोग्य सेवा जलद गतीने कार्यान्वित होऊन समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहचेल व होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी यांच्यात समन्वय साधून एकात्मिक वैद्यकिय व्यवस्था निर्माण होईल" असेही डॉ. शर्मा म्हणाले,
" कृत्रिम बुध्दीमत्ता आणि होमिओपॅथी” याबाबत बोलताना डॉ. शर्मा म्हणाले, कृत्रिम बुध्दीमत्ता डिजीटल हेल्थ, टेलीमेडीसीन च्या वापरामुळे रुग्णांच्या लक्षणांचे विश्लेषण कमी वेळेत होऊन रोगांचे अचूक निदान करणे सोपे झाले आहे. डॉ. राहुल जोशी (मुंबई) यांनी "तात्काळ उद्भवणाऱ्या आजारासाठी होमिओपॅथिची आवश्यक्ता" या विषयावर बोलताना होमिओपॅथी औषधप्रणाली नुसार रुग्णांची माहिती कशा प्रकारे घ्यावी यासंबंधी विवेचन केले.
शासकिय होमिओपॅथी महाविद्यालय, कागल चे प्रभारी प्राचार्य डॉ. रोझारिओ डिसोझा "राष्ट्रीय वैद्यकीय व्यवसाय पूर्वपरिक्षा" या विषयावर मागदर्शन केले.
डॉ. प्रशांत तांबोळी (मुंबई) यांनी "सार्वत्रिक आरोग्य सेवेत होमिओपॅथिचा संशोधन विकास" तर डॉ. संतोष रानडे यांनी “बालकांच्या आरोग्यासाठी होमिओपॅथी” याविषयावर मार्गदर्शन केले. होमेसा प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील यांनी  असोसिएशन मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. परिषदेच्या संयोजक सचिव डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी "निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य होमिओपॅथीसह" या परिषदेच्या संकल्पनेबाबत सविस्तर भाष्य केले. सचिव डॉ. राजेश कागले यांनी आभार मानले..परिषद यशस्वी होणेसाठी डॉ. उदय पुराणिक, डॉ. सादिक मुकादम, डॉ. सुजाता कामिरे, डॉ. महावीर वसवाजे, डॉ. जितेंद्र वीर, डॉ. बदिन मणेर, डॉ. सचिन मगदुम डॉ. महेश पटेल, डॉ. दिपक लडगेनी विशेष परिश्रम घेतले. परिषदेस सुमारे ४०० होमिओपॅथ्स उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes