Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी घेणार तालुकास्तरीय आढावा बैठक, जनता दरबार भरवणार दिवाळीनंतर नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान अन् गुजरातसाठी विमानसेवा - धनंजय महाडिकशाहूवाडीच्या एमआयडीतील गुंतवणुकीसाठी आमदार विनय कोरेंनी घातली कोल्हापुरातील उद्योजकांना सादडीवाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या ! राज्यात तिसऱ्या स्थानी,नवी दिल्लीत सन्मान !!कृष्णराज महाडिक यांच्या युवाशक्ती जागर यात्रेचे सिंधुदुर्गमध्ये जल्लोषी स्वागतन्यू कॉलेजची विद्यार्थिनी श्रेया गुरवला तीस हजाराची शिष्यवृत्तीन्याय- बंधुता - समता या त्रिसूत्रीवर काम करणार - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडशिवसेनेतील निष्ठावंताना विविध नियुक्त्या, पदांच्या माध्यमातून न्याय द्यावाश्री स्वामी समर्थांच्या जीवनावर रॅपसाँग, २४ मे रोजी कोल्हापुरात लॉन्चिंग !आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार अवतारनगरी

जाहिरात

 

प्रस्तावित आयटी पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नाव द्या, आमदार क्षीरसागरांची उद्योगमंत्र्यांच्याकडे मागणी

schedule25 Apr 26 person by visibility 128 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :  कोल्हापूरला आय.टी.पार्क स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल. आयटीपार्क कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असून, या आय.टी.पार्कच्या माध्यमातून छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याला, स्मृतींना उजाळा मिळावा या उद्देशाने आयटी पार्कचे “करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी आयटी.पार्क” असे नामकरण करावे. ’अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

यासह आय.टी.पार्क विकसित होत असताना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून उच्च दर्जाच्या पायाभूत सोयी उपलब्ध कराव्यात अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिवसेना संपर्कप्रमुख पदावर नियुक्तीनंतर उद्योगमंत्री सामंत हे श्निवरारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. संपर्कप्रमुख नियुक्तीबाबत सामंत यांचा आमदार र क्षीरसागर आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह येथे स्वागत करीत जाहीर सत्कार केला.

प्रस्तावित आयटी पार्कची शेंडा पार्क येथील जमीन ही शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित असल्याने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून आय.टी.पार्क विकसित करीत असताना उच्च दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने 'झिरो-डिग' युटिलिटी ट्रॅचेस, ग्लोबल, डार्क फायबर कॉरिडॉर व प्रायव्हेट 6G टेस्टबेड, ग्लोबल IP आणि पेटंट डेस्क, 'झिरो कार्बन' ग्रीन बिल्डिंग्स, आयटी पार्कमध्येच समर्पित एक्सप्रेस फीडर आणि २२०/३३/११ केव्ही सबस्टेशनसह मजबूत वीजपुरवठा नेटवर्क, २००० घनमीटर जीएसआर आणि १००० घनमीटर ईएसआरसह समर्पित २४ तास पाणीपुरवठा अशा सुविधा असाव्यात अशी मागणी केली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा समन्वय सत्यजित कदम यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक,  पदाधिकारी उपस्थित होते 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes