महायुतीचे संचालक गैरहजर, सभा तहकूब ! गोकुळ अध्यक्ष निवड लांबणीवर !!
schedule29 Oct 26 person by visibility 616 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापुरात महायुती आणि महाविकास आघाडीतील शह- काटशहाचा परिणाम गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवर झाला. अध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी 29 ऑक्टोबर रोजी बोलावण्यात आलेल्या संचालकांच्या सभेला महायुतीचे 12 संचालक गैरहजर राहिले. त्यामुळे कोरम अभावी अध्यक्ष निवडीची सभा तहकूब करावी लागली. सभा तहकूब झाल्यामुळे अध्यक्षपदाची निवड होऊ शकली नाही. गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्षपदासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. अध्यक्ष निवडीच्या सभेला संचालकांना गैरहजर ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेते मंडळींनी महाविकास आघाडीचे नेते व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना धक्का दिला. गोकुळमध्ये महाविकास आघाडीकडे 13 संचालकांचे बहुमत आहे तर महायुतीकडे 12 संचालक आहेत. दरम्यान दुपारी बारा वाजेपर्यंत कोरम पूर्तता होते का याची वाट पाहण्यात आली मात्र माहितीचे संचालक सगळीकडे फिरकले नाहीत त्यामुळे बारा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास सभा तहकूब करण्यात आली.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गोकुळ दूध प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावून पोलिसांनी वाहतूक अडवली होती. गोकुळ दूध संघाच्या आवारात ही ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जात होता. गोकुळ दूध संघाची निवडणूक ही महाविकास आघाडीने युतीच्या नेते मंडळासाठी राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची ठरली होती नुकत्याच झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सणविचार या आघाडीने 13 जागा जिंकत बहुमत मिळवले होते तर महायुतीला 12 जागा मिळाल्या होत्या मात्र अध्यक्ष निवडीसाठी आयोजित सभेला गणपतीसाठी 14 संचालकांची उपस्थिती अनिवार्य आहे 14 संचालक जर सभेला उपस्थित नसतील तर कोरम पूर्ण होत नाही. यामुळे सभा तहकूब करण्यासंदर्भातील सहकार नियमावर तरतूद आहे. त्या नियमाचा आधार घेत महायुतीच्या नेते मंडळींनी 12 संचालकांना सभेपासून दूर ठेवले.
दरम्यान आदेश पदाच्या निवडीच्या सभेसाठी समविचारी आघाडीचे तेरा संचालक सकाळी 11 च्या अगोदर गोकुळ दूध प्रकल्प कार्यालयात दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रेमदास राठोड, युसुफ शेख यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात झाली. या सभेला समविचारी आघाडीचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगुले, अभिजीत तायशेटे, प्रा. किसन चौगले, राहुल देसाई, शशिकांत खोत, विश्वजीत जाधव, अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे, बाबासाहेब देवकर, विद्याधर गुरंबे, बयाजी शेळके आणि राजूबाबा आवळे सभेला उपस्थित राहिले. गोकुळ अध्यक्ष निवडीच्या अनुषंगाने गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्पाच्या बाहेर समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाहेर गर्दी केली होती.