शिक्षक मतदार संघात कौस्तुभ गावडे आघाडीवर ! पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख फास्ट!!
schedule28 Oct 26 person by visibility 344 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघांमध्ये 22 फेरी अखेर भारतीय जनता पक्षाचे कौस्तुभ गावडे हे 17650 मते घेऊन आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेने पाठिंबा दिलेले उमेदवार सचिन नवनाथ सानप आहेत. सानप यांना अकरा हजार 383 इतकी मते आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार असलेले माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना दहा हजार 401 इतकी मते आहेत. महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर हे चौथ्या क्रमांकावर आहेत. आसगावकर यांना 8390 इतकी मते आहेत . वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आय सी शेख यांना 217 तर कायम विना अनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे यांना 1119 मते आहेत. पंढरपूर येथील बी पी रोंगे यांना 2056 इतकी मते आहेत. शिक्षक मतदार संघामध्ये वैध मते 51 हजार 511 इतके आहेत. तर विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा हा 25 हजार 756 इतका आहे. तर पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार हर्षदा देशमुख या मतमोजणीत आघाडीवर आहेत या मतदारसंघांमध्ये भाजपकडून स्मिता योगेश जाधव या उमेदवार असून त्या पिछाडीवर आहेत. हर्षदा देशमुख-जाधव यांनी पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत आघाडी घेतली आहे.देशमुख यांना १,०९,७०६ मते, तर भाजपच्या जाधव यांना सुमारे ९९ हजार मते मिळाली आहेत. विजयासाठी आवश्यक १,१३,११३ मतांच्या कोट्यापासून देशमुख ३,४०७ मतांनी दूर आहेत.