Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संवाद  औपचारिकतेपलीकडचा : विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पांचा! कुलगुरुंच्या निवासस्थानची हृदय भेट ! !आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन, तीन वर्षांच्या रिपोर्ट कार्डवर श्रेणी निश्चितीमाणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या चौकटी मोडून टाकण्याची जबाबदारी शिक्षकांची : हिंदुराव हुजरे-पाटीलकोजिमाशितर्फे कर्जमर्यादा ६२ लाखापर्यंत ! २४ टक्के लाभांश, मंगळवारपासून खात्यावर जमा ! !  शिक्षकांचे आंदोलन, निवेदन स्वीकारायला वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित ! आमदारांनी केला जिल्हा प्रशासनाला निषेध !!आठ थर अन् ट्रिपल एक्क्याची कमाल…शिवनेरी गोविंदा पथकाने फोडली युवाशक्तीची तीन लाखाची दहीहंडी सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने प्रतिकात्मक दहीहंडीकृष्णराज महाडिकांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, मनसेच्या नादाला लागू नयेकॅम्पस टू कार्पोरेट...बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये मायक्रोसॉफ्टकडून मार्गदर्शनसन्मानाच्या दिनीच शिक्षक रस्त्यावर !  जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !!

जाहिरात

 

कोजिमाशितर्फे कर्जमर्यादा ६२ लाखापर्यंत ! २४ टक्के लाभांश, मंगळवारपासून खात्यावर जमा ! ! 

schedule06 Sep 26 person by visibility 128 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेतर्फें सभासद कर्ज ५० लाख , प्रासंगिक १० लाख , व तातडीचे २ लाख अशी एकूण ६२ लाख रुपये कर्जमर्यादा  करण्यात आली. कोजिमाशिची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, (सहा सप्टेंबर २०२६) झाली. चेअरमन राजेंद्र पाटील व तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी सभेत यासंदर्भातील घोषणा केली. तसेच सभासदांना बारा टक्के उत्तेजनार्थसह एकूण २४ टक्के लाभांश दिला जाणार आहे. लाभांशाची एकूण सात कोटी ६७ लाख १७ हजार १३२ रुपये सभासदांना मंगळवारी, आठ सप्टेंबरपासून मिळतील असेही त्यांनी सांगितले. महासैनिक दरबार हॉल येथे सभा झाली.

‘विमानवारीसाठी बिनव्याजी तर लॅपटॉप व सोलर खरेदीसाठी अल्पव्याज दरात कर्ज पुरवठा करणे, ई - बाईकसाठी कर्ज पुरवठा करणे , सभासदासाठी मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स सुरू करणे , अपघाती विमा उतरणे  , ७०० कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करणे ,शासनाच्या समाजकल्याण खाते अंतर्गत अनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांना सभासदत्व देणे, आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.

चेअरमन पाटील यांनी पतसंस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा व उपक्रमांची माहिती दिली. पतसंस्थेला ऑडिट वर्ग 'अ ' असल्याचे सांगितले. तज्ज्ञ संचालक लाड यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता असल्याचे सांगितले. संस्थेतर्फे ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू करण्यात आली असून प्रधान कार्यालयासह सर्व शाखा सीसीटीव्ही कक्षेत सुरक्षित आहेत , सभासदांना दिपावली भेट ,मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ, लाभांश या विषयांचा ऊहापोह केला. मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत  कुरडे यांनी अहवाल वाचन केले. चर्चेत सुहास पाटील, अमरसिंह रजपूत, महालिंग मिठारी, बसाप्पा मडिवाळ, एम. के. पाटील, बाबासाहेब पवार, हरिश्चंद गायकवाड, अविनाश कर्णिक, आनंदा कांबळे, निवास ताम्हणकर यांनी सहभाग घेतला.
 सभेला संचालक अविनाश चौगले , दिपक पाटील , सचिन शिंदे ,मदन निकम , उत्तम पाटील ,राजाराम शिंदे , लक्ष्मण डेळेकर ,दत्तात्रय घुगरे , अनिल चव्हाण , राजेंद्र रानमाळे ,शरद तावदारे , श्रीकांत कदम , पांडुरंग हळदकर ,श्रीकांत पाटील , सुभाष खामकर , मनोहर पाटील ,जितेंद्र म्हैशाळे , ऋतुजा पाटील , शितल हिरेमठ 'पांडुरंग पाटील उपस्थित होते. एस पी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्हाईस चेअरमन प्रकाश कोकाटे यांनी आभार मांनले.


 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes