Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षकांचे आंदोलन, निवेदन स्वीकारायला वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित ! आमदारांनी केला जिल्हा प्रशासनाला निषेध !!आठ थर अन् ट्रिपल एक्क्याची कमाल…शिवनेरी गोविंदा पथकाने फोडली युवाशक्तीची तीन लाखाची दहीहंडी सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने प्रतिकात्मक दहीहंडीकृष्णराज महाडिकांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, मनसेच्या नादाला लागू नयेकॅम्पस टू कार्पोरेट...बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये मायक्रोसॉफ्टकडून मार्गदर्शनसन्मानाच्या दिनीच शिक्षक रस्त्यावर !  जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !!गोकुळमध्ये महायुतीचा दोन हजाराहून अधिक मतांनी विजय, ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवावी - हसन मुश्रीफश्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोकुळ शॉपीचे उद्घाटन‘टाइम टू मार्केट’ साधणाराच खरा उद्योजक, ग्रीन हायड्रोजनमध्ये मोठी संधी : कुलगुरू डॉ. राजनीश कामतराजू शेट्टी हे स्टंटबाज आंदोलक, सतेज पाटलांनी माझ्या मंत्रीपदाची काळजी करू नये - आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

आठ थर अन् ट्रिपल एक्क्याची कमाल…शिवनेरी गोविंदा पथकाने फोडली युवाशक्तीची तीन लाखाची दहीहंडी

schedule05 Sep 26 person by visibility 91 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ढोलताशाचा गजर, लेझीमचा ठेका, गोविंदा रे गोपाळाचा घोष आणि तरुणाईचा ओसांडून वाहणारा उत्साह अशा जोशपूर्ण वातावरणात तासगाव येथील शिवनेरी गोविंदा पथकाने धनंजय महाडिक युवा शक्तीची तीन लाख रुपये बक्षीसाची दहीहंडी फोडली. आठ थर रचत शिवनेरी गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत साऱ्याची मने जिंकली. दसरा चौक येथील मैदानावर हा थरारक सोहळा, शनिवारी पाच सप्टेंबर रोजी झाला. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विजेत्या संघाला तीन लाख रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले.

दरम्यान धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडीला मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, स्वरुप महाडिक, बांधकाम व्यावसायिक शंकर पाटील, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सुहास लटोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, उपमहापौर अक्षय जरग, गोकुळचे माजी संचालक अंबरिश घाटगे, चेतन नरके, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेते मुरलीधर जाधव, विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली. तत्पूर्वीच सारे मैदान गर्दीने फुलले होते. प्रारंभी स्वराज्य  ढोल ताशा पथक व सार्थक क्रिएशन्सच्या कलाकारांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यानंतर लेझीम सादरीकरण झाले. खासदार महाडिक व पुत्रांनी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला.

विविध भागातील गोविंदा पथक दहीहंडी स्पर्धेसाठी दाखल झाले होते. यामध्ये बाजी मारली तासगाव येथील शिवनेरी गोविंदा पथकाने. आठ थर रचताना त्यांनी ट्रिपल एक्का हे सूत्र अवलंबिले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दही हंडी फुटताच मैदान पुन्हा एकदा गोविंदा रे गोपाळा असा गजर घुमला. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते आदिल फरास, भूषण पाटील, नगरसेवक विजय देसाई, अभिजीत खतकर, अविनाश कुंभार, संग्राम निकम,  भाजपाचे महेश जाधव, राहुल चिकोडे, डॉ. आनंद गुरव, महेश चौगले, समीर शेठ आदी उपस्थित होते. पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes