Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संवाद  औपचारिकतेपलीकडचा : विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पांचा! कुलगुरुंच्या निवासस्थानची हृदय भेट ! !आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन, तीन वर्षांच्या रिपोर्ट कार्डवर श्रेणी निश्चितीमाणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या चौकटी मोडून टाकण्याची जबाबदारी शिक्षकांची : हिंदुराव हुजरे-पाटीलकोजिमाशितर्फे कर्जमर्यादा ६२ लाखापर्यंत ! २४ टक्के लाभांश, मंगळवारपासून खात्यावर जमा ! !  शिक्षकांचे आंदोलन, निवेदन स्वीकारायला वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित ! आमदारांनी केला जिल्हा प्रशासनाला निषेध !!आठ थर अन् ट्रिपल एक्क्याची कमाल…शिवनेरी गोविंदा पथकाने फोडली युवाशक्तीची तीन लाखाची दहीहंडी सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने प्रतिकात्मक दहीहंडीकृष्णराज महाडिकांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, मनसेच्या नादाला लागू नयेकॅम्पस टू कार्पोरेट...बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये मायक्रोसॉफ्टकडून मार्गदर्शनसन्मानाच्या दिनीच शिक्षक रस्त्यावर !  जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !!

जाहिरात

 

माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या चौकटी मोडून टाकण्याची जबाबदारी शिक्षकांची : हिंदुराव हुजरे-पाटील

schedule06 Sep 26 person by visibility 55 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘ जात, धर्म टोकदार होण्याच्या काळात फक्त पुस्तकी शिक्षण न देता पूर्वापार चालत आलेल्या परंपरावादी माणूसपणाला बंदिस्त करू पाहणाऱ्या सर्व गुलामी लागणार्‍या चौकटी मोडून टाकणे, त्यांना संवादी करत मानवतावादी बनविण्यासाठी आजच्या शिक्षकांची मूलभूत जबाबदारी घ्यावी’ , असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील यांनी केले.
 पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर, ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राचार्य डॉ. हरीश भालेराव यांना इंडियन टीचर्स फोरमचा नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ते बोलत होते. इंडियन टीचर्स फोरमचे प्रमुख डॉ. डी. श्रीकांत अध्यक्षस्थानी होते. सुरेश केसरकर,  अनिल म्हमाने, डॉ. श्रीपाद देसाई, लेखिका डॉ. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, मोहन मिणचेकर यांनी मनोगते व्यक्त केली.
आमदार प्रा. जयंत आसगावकर म्हणाले, आज राजकारणात मनमानी चालू आहे. राज्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणे गरजेचे आहे. देश संविधानावर चालला पाहिजे. भयमुक्त शिक्षण मिळणे गरजेचे आहे. शिक्षणात संविधान मूल्य रुजवली पाहिजेत. सध्या मुलांच्यावर शिक्षकांनी मानवहिताचे, सामाजिक भान राखणारे योग्य संस्कार करणे गरजेचे आहे.’ डॉ. हरीश भालेराव म्हणाले, शिक्षण क्षेत्रात सामाजिक भान निर्माण होणे गरजेचे आहे. आजच्या शिक्षणात व्यापक कल्याणकारी तत्त्वज्ञान रुजवण्याची गरज आहे. देश, समाज भय व शोषणमुक्त बनवला पाहिजे. प्रा. विक्रम कदम, शिकंदर बेलोशे, चंद्रकांत कासार, स्वाती लोखंडे, दशरथ जाधव, सतिश घुगरे, मनिषा गावडे, डॉ. रेखा गोरे, मयुरी जंत्रे, रवींद्र सूर्यवंशी यांना यावेळी नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. अभिजीत मासुर्लीकर यांनी सूत्रसंचालन केले. अंतिमा कोल्हापूरकर यांनी आभार मानले.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes