Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, हसन मुश्रीफांची कोपरखळी

जाहिरात

 

चिन्मय मिशनचे स्वामी अभेदानंद यांची कोल्हापूरात व्याख्यानमाला

schedule01 Apr 26 person by visibility 69 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील चिन्मय सेवा समितीच्यावतीने वक्ते  स्वामी अभेदानंद  यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन तीन ते  आठ एप्रिल २०२६ या कालावधीत केले आहे. रोज सायंकाळी ६.३० ते ८:०० या वेळेत "गीतेतील भक्ती, शक्ती आणि मुक्ती " या विषयावर चिन्मय पुष्पांजली, प्रतिभा नगर मेन रोड, आजरा बँकेसमोर, कोल्हापूर येथे ही व्याख्यानमाला होणार आहे.  व्याख्यानमालेचे हे दहावे वर्ष आहे. अशी माहिती चिन्मय मिशन कोल्हापूरचे प्रभारी स्वामी दत्तराजानंद, चिन्मय व्याख्यानमालेचे अध्यक्ष  डॉ. वासुदेव देशिंगकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 स्वामी अभेदानंद गेली तीस वर्षाहून अधिक काळ चिन्मय मिशनच्या देशातील आणि विदेशातील केंद्रामध्ये कार्यरत आहेत.  गेल्या वीस वर्षापासून ते दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्यरत असून तेथे त्यांनी सहा नवीन आश्रम आणि दोन मंदिरे उभारली आहेत. भारतीय  संस्कृती,  भक्ती, वेदांत,  योग  या विषयावर ते संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषेतून जगभर प्रसार करत आहेत.  व्याख्यानमाला ही सर्वांना खुली असून प्रवेश विनामूल्य आहे.  तरी नागरिकांनी या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.  या पत्रकार परिषदेस चिन्मय सेवा समितीचे अध्यक्ष हसमुख शहा, कोषाध्यक्ष स्नेहल कारंडे, मेघा जोशी, प्रा.विलास गंभीरे, श्री अभय मगदूम आदी उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes