Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वीर कक्कय विद्यालयात बाल कलाकारांचा बाजार, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा रुजविणारा उपक्रमउच्च शिक्षण संस्थांमध्ये सशक्त संशोधन संस्कृती रुजवणे काळाची गरज : डॉ. महादेव लोखंडेलिंगायत माळी समाजाच्या सांस्कृतिक केंद्र-वसतिगृह बांधकामासाठी भरीव मदत करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकरसेवा रुग्णालयातील एमआरआय-सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब - यलो फीवर लसीकरण सेंटरचे लोकार्पणडॉ. गणपती कमळकर यांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशनछत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे शनिवारी सभासदांना दिपावली भेटवस्तू वाटपसत्यजीत जाधवांनी दिले विद्यार्थिनींच्या हिताला प्राधान्य, केएमटी पास सवलतीस परिवहन समितीकडून मान्यता२९ जूनचे पदोन्नती समुपदेशन रद्द करावे, सेवाज्येष्ठ शिक्षकांचे प्रशासनाला निवेदनमनस्वी महिला समूहातर्फे रविवारी महिला शिक्षकांचा मेळावा, सत्कार सोहळाजयवंत महाविद्यालयाच्या पेटंट डिझाईनवर भारत सरकारची मंजुरीची मोहोर

जाहिरात

 

सेवा रुग्णालयातील एमआरआय-सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब - यलो फीवर लसीकरण सेंटरचे लोकार्पण

schedule31 Oct 26 person by visibility 54 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘प्रत्येक नागरिकाला सरकारी रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा देण्यासाठी तसेच या आरोग्य सेवांवर प्रत्येक नागरिकाचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर आहे.’असे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब व यलो फीवर लसीकरण सेंटरचे फित कापून लोकार्पण मंत्री आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सारिका नांदेकर, महिला व बाल कल्याण सभापती कौसर बागवान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, सेवा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर, माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.एल. कदम, कृष्णा डायग्नोस्टिकचे कार्यकारी अध्यक्ष आदर्श कर्नावत उपस्थित होते.

आबिटकर म्हणाले, कोल्हापूरला मेडिकल हब म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये शासनाच्या वतीने विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सेवा रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन आणि अत्याधुनिक लॅब अशा विविध सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. यासोबतच कॅन्सर निदान आणि उपचार सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. येत्या काही महिन्यांत ब्रेन स्ट्रोक सेंटर, कॅन्सर सर्जरीसाठी ऑन्कोलॉजी विभाग आणि कॅथलॅब सुरु करण्याचे नियोजन आहे. मोफत व माफक दरात आरोग्य सुविधा देण्यासाठी सीपीआर रुग्णालयाबरोबरच सेवा रुग्णालयही पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आशेचा किरण बनेल. सेवा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांनी प्रास्ताविक केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes