वीर कक्कय विद्यालयात बाल कलाकारांचा बाजार, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा रुजविणारा उपक्रम
schedule01 Nov 26 person by visibility 147 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जवाहरनगर येथील वीर कक्कय विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यशिक्षण व व्यावसायिक शिक्षणांतर्गत ‘कौशल मेळावा – दिवाळी उत्पादने प्रदर्शन व विक्री’ हा उपक्रम आयोजित केला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून ‘बालकलाकारांचा बाजार – आम्ही बनवतो, तुम्ही विकत घ्या’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम झाला. विद्यार्थ्यांना स्वतः तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. यामध्ये जवळपास दहा हजार रुपये किंमतीच्य वस्तूंची विक्री झाली.
या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आणि मेहनतीतून तयार केलेल्या विविध दिवाळी उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. आकाश कंदील, पणत्या, रांगोळ्या, उटणे तसेच विविध आकर्षक सजावटीच्या वस्तूंनी प्रदर्शनाला विशेष रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, विविध शालेय समित्यांचे पदाधिकारी, पालक व नागरिकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी केली. ‘पुस्तकी ज्ञानाला कृतीची जोड आणि बालहातांना उद्योजकतेची गोडी’ देणारा हा कौशल मेळावा विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायी व प्रेरणादायी अनुभव देणारा आहे.’अशा शब्दांत कौतुक केले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, आर्थिक साक्षरता, संघभावना, व्यावसायिक दृष्टिकोन आणि उद्योजकतेची बीजे रुजविणे हा होता. या कार्यक्रमास प्रभागाच्या नगरसेविका रेखा उगवेयांच्या हस्ते झाले. तसेच कार्यक्रमासाठी नगरसेवक प्रवीण सोनवणे, नियाज खान, माधुरी व्हटकर, प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी जयश्री जाधव, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, सुधाकर सावंत आणि अपंग समावेशित शिक्षणाचे समन्वयक राजेंद्र आपुगडे, विशेष शिक्षिका नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिक्षक साताप्पा पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका मोमीन यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक संजय कडगावे यांनी आभार मानले.