Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, हसन मुश्रीफांची कोपरखळी

जाहिरात

 

१२०० प्राथमिक दूध संस्थासंदर्भात गोकुळची चौकशी, दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

schedule01 Apr 26 person by visibility 102 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळशी संलग्न १२०० प्राथमिक दूध संस्थांसंदर्भात झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. सहकारी संस्था दुग्ध पुणे विभागीय उपनिबंधकांनी, चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सहकारी संस्था दुग्ध विभाग सांगलीचे सहायक निबंधक व जिल्हा विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था पदुम सांगली हे चौकशी अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करुन लवकरात लवकर अहवाल सादर करावा असे आदेश आहेत.

श्री महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी तीन मार्च २०२६ रोजी विभागीय उपनिबंधकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये सुमारे १२०० सहकारी दूध संस्थांची संशयास्पद व नियमबाह्य नोंदणी असल्याची तक्रार आहे. याशिवाय ३१ मार्च २०२६ रोजी केलेल्या तक्रारीत, गोकुळच्या संचालक मंडळाने नियम व कायद्याला डावलून एकूण ४२३ दूध संस्थांची सभासद म्हणून नोंदणी केली असे म्हटले आहे.या दोन्ही तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करुन चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा असे आदेशात म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes