Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खासबाग मैदानाची स्वच्छता, दसऱ्यानंतर खासदार - आमदारांच्या निवासस्थानासमोर निदर्शनेसंजय घोडावत विद्यापीठाचा सोळा ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ गोकुळच्या व्यासपीठावर आबिटकर –के. पी. एकत्र !  महायुतीच्या विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल ! !शिक्षकांशी संवाद, प्रश्नांची उकल! कौस्तुभ गावडेंची शहरातील शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी! !आरपीआय गवई गटाचा महाविकास आघाडीला पाठिंबा! प्रा. जयंत आसगावकर, हर्षदा देशमुखांनाना दिले पाठिंब्याचे पत्र!!सतेज पाटील गृहराज्यमंत्री असताना गोकुळची सूत्रे मुंबईतून हलत होती - मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार आमदार फंडातील शंभर टक्के निधी आसगावकरांनी शाळांसाठी खर्च केला, नावातच जयंत असल्यामुळे पराभव अशक्य : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील४४०० ठराव असल्याचा डांगोरा पिटता, मग शपथा कशाला घ्यायला लावता ? महायुतीचे नेते मुंबई - दिल्लीपुढे हतबल : सतेज पाटलांचा हल्लाबोलगोकुळ निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत !  नविद मुश्रीफ विरुद्ध शशिकांत खोत!!जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार - कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

शिक्षकांशी संवाद, प्रश्नांची उकल! कौस्तुभ गावडेंची शहरातील शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी! !

schedule12 Oct 26 person by visibility 125 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,  कोल्हापूर : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी सोमवारी (१२ ऑक्टोबर २०२६) यांनी कोल्हापूर शहरातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. श्री शहाजी छत्रपती कॉलेज, गोखले कॉलेज, महावीर कॉलेज आणि नेहरु हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांशी संवाद साधला.

या भेटींच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती, शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपाययोजना आणि भविष्यातील आव्हाने यांवर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी कौस्तुभ गावडे यांनी शिक्षक, प्राचार्य व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधत शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. शिक्षकांचा सन्मान, त्यांच्या प्रश्नांची जाण आणि शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संवाद व समन्वय, या मुद्द्यांवर संवाद साधली. गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज येथे चेअरमन डॉ. मंजिरी अजित मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिलचे मा. श्री. दौलत देसाई, सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य वाय. डी. पाटील, प्रा. पी. बी. झावरे आणि प्रा. आनंद मेणसे यांची उपस्थिती होती. यावेळी शिक्षकांच्या प्रश्नांना सक्षम व्यासपीठ मिळवून देणे आणि शैक्षणिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांबाबत चर्चा करण्यात आली.

महावीर महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. ए. डी. जोशी, दादासाहेब मगदूम हायस्कूलचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद आणि कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. गोमटेश पाटील उपस्थित होते. नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दि मोहमेडन एज्युकेशन सोसायटीचे तसेच मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गनी आजरेकर, स्कूल कमिटीचे चेअरमन रफीक शेख आणि मुख्याध्यापक काजे यांच्याशी शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा झाली. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, डॉ. अनिल मालगुडे, डॉ. के. एन. देसाई डॉ. राहुल मांडणीकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes