Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अमित शहांच्या सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा, एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढले बाहेरभारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, एक- एक घुसखोर शोधून देशाबाहेर घालवू - अमित शाहअंबाबाई मंदिर विकास आराखडयामुळे धार्मिक पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळशहरात २२ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठाटीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्थाशिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटपशिवसेनेचा साठावा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरागायक पंडित विनोद डिग्रजकरांनी अमेरिकत उलगडला बंदिशींचा खजानाटीईटी परीक्षेसाठी राज्यभरात सहा लाखावर परीक्षार्थी, १८ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉचगांधीनगर परिसरातील बांधकामाबाबत भाजप - शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, सुनील मोदींनी तो व्हिडिओ दाखवावा

जाहिरात

 

शहरात २२ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

schedule20 Jun 26 person by visibility 45 categoryमहानगरपालिका

महाराष्ट् न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अलनिनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या घटली असून धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणीउपसा अत्यंत कमी झाला आहे. परिणामी काळम्मावाडी योजनेतून शहराला नियमित पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने कोल्हापूर महानगरपालिकेने शहर व उपनगरांमध्ये सोमवार २२ जून २०२६ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.
महापालिकेकडून शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पर्यायी पाणीउपसा सुरू करण्यात आला असून आगामी पावसाची शक्यता व पंचगंगा नदीची पाणीपातळी लक्षात घेऊन या केंद्रांच्या क्षमतेनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. चंबुखडी, पुईखडी व कसबा बावडा फिल्टर हाऊसवरून वितरित होणाऱ्या विविध भागांमध्ये सोमवार, दि. २२ जून व मंगळवार, दि. २३ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
 महापालिकेने नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes