वालावलकर हायस्कूलमध्ये गुढी ज्ञानाची
schedule19 Mar 26 person by visibility 27 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने शाळेत पुस्तकांची गुढी उभी करण्यात आली . पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी प्रवेशासाठी गर्दी केलेली दिसून आली . शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी यांनी पालकांचे व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शाळेतील जिमखाना प्रमुख डॉ.राजेंद्र बनसोडे, समीर जमादार, विश्वास माळी व ग्रंथपाल गुरुदत्त पाटील उपस्थित होते .