Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुटबॉल स्पर्धेतून शिवाजी तरुण मंडळाची माघारचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, दिलबहार तालीम मंडळ विजयीगल्लीतील भांडणसारखे दोन गटनेते महापालिकेत भिडले ! शारंगधर देशमुख - आदिल फरासांत पुन्हा घमासान ! !सांगलीत भाजप चितपट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदी महाविकास आघाडी विजयी !सीईओची ताराराणी महोत्सवाला भेट, बचत गटाकडून वस्तूंची  खरेदीगोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभजिपचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापतीसाठी नवीन वाहन, अंदाजपत्रकात चार कोटीची तरतूदजुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागत

जाहिरात

 

फुटबॉल स्पर्धेतून शिवाजी तरुण मंडळाची माघार

schedule18 Mar 26 person by visibility 45 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील नामांकित फुटबॉल संघ म्हणून श्री शिवाजी तरुण मंडळ फुटबॉल संघाची ओळख. दरम्यान या संघाने, सध्या सुरू असलेल्या ‘चंद्रकांत चषक’फुटबॉल स्पर्धेतून माघार घेतली आहे.स्पर्धेच्या उद्घाटनदिवशी श्री शिवाजी तरुण मंडळ फुटबॉल संघ व फुलेवाडी फुटबॉल संघात सामना होता. मात्र या स्पर्धेसाठी शिवाजी तरुण मंडळाचा संघ मैदानात उतरला नाही. मंडळाने पत्रकांत म्हटले आहे, ‘राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचाच्या काही चुकीच्या आणि पक्षपाती निर्णयामुळे शिवाजी तरुण मंडळ संघावर मोठा अन्याय झाला अशी आमची भावना आहे. त्या सामन्यातील पंचाच्या निर्णयाविरोधात आम्ही, केएसएकडे रितसर तक्रार दाखल केली होती.त्याला एका आठवडा होऊन गेला, अद्याप केएसएकडून कोणताही ठोस प्रतिसाद किंवा निर्णय मिळालेला नाही. एका जुन्या बलाढय संघासोबत केएसए प्रशासनाची उदासिनता खेदजनक आहे. आमच्या संघाच्या बाबतीत सातत्याने उपेक्षा होत आहे.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes