Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्राथमिक दूध संस्थांच्या न्यायासाठी गोकुळच्या संचालकांनी ठोकला शडडूजिल्हा परिषदेची सत्ता लाडक्या बहिणींच्या हाती ! सहापैकी पाच पदावर महिला !!-शिक्षक पात्रता परीक्षा एकवीस जूनला, आवेदनपत्र भरण्याची मुदत सोळा एप्रिलपर्यंतआयटी. पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर, औद्योगिक विकास महामंडळाने भरले ५ कोटी ६० लाखनिलंबित कर्मचाऱ्यांच्यावर लाखो रुपयांचा खर्च, महापालिका त्यांना फुकट का पोसते ? नगरसेवकांचा सभागृहाला सवालजिप समिती सभापतिपदासाठी नावे घोषित ! सारिका नांदेकर, शीतल यादव विद्या पाटील, श्रद्धा गायकवाड !!पाटाकडील तालीम मंडळाने जिंकली चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा ! खंडोबा तालीम मंडळ उपविजेता !!कोल्हापूर-नवी मुंबई ! इंडिगो एअरलाईन्सची दिवसातून दोन वेळा विमान सेवा !!निरोगी आरोग्यासाठी होमिओपॅथीसुध्दा सक्षम पर्याय - डॉ. धर्मेंद्र शर्मा संचालक म्हणून आम्ही प्राथमिक दूध संस्थांच्या पाठीशी, अदृश्य शक्तीचा डाव उधळून लावू- नविद मुश्रीफ

जाहिरात

 

महाराष्ट्राची प्रगतशील विचारधारा आणखी समद्ध करा - श्रीमती सरोज पाटील

schedule28 Mar 26 person by visibility 293 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘महाराष्ट्राला शाहू –फुले –आंबेडकर यांच्या विचारकार्याचा मोठा वारसा लाभला आहे. हा प्रगतशील विचारांचा वारसा तरुण वर्गांनी आणखी समृद्ध करावा’असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्षा श्रीमती सरोज एन पाटील यांनी केले.

 शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीच्यावतीने आयोजित ‘शिव महोत्सव २०२६’चे आयोजन केले होते. खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला. याप्रसंगी  श्रीमती पाटील यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना ‘शिव-जीवनगौरव पुरस्कार’ तर राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भरत लाटकर यांना ‘शिव-सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहेराज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांची विशेष उपस्थिती होती. विद्यापीठातील राजमाता जिजाऊ सभागृह येथे हा पुरस्कार वितरण समारंभ दिमाखात पार पडला. याप्रसंगी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

‘महाराष्ट्राचा प्रगतशील विचार हा साऱ्यांना बरोबर घेऊन जाणारा आहे. त्याच विचारधारेने वाटचाल करायची आहे.’असे नमूद करत श्रीमती पाटील यांनी बुबावाजी, कर्मकांडाचा समाचार घेतला. बुवाबाजीच्या प्रकाराला अनेक महिला बळी पडल्या. हे सामाजिक स्वास्थाच्यादृष्टीने चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. भरत लाटकर यांनी, ‘नवा समाज निर्मितीसाठी सारे एकत्र येऊ या. उच्चनीचतेला मूठमाती देत एकतेचे, समानतेचे गीत गाऊ’असे आवाहन केले.

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांनी प्रास्ताविक केले. महोत्सव समितीचे अध्यक्ष मंजीत माने यांनी स्वागत केले. सत्यजीत कोसंबी यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. रघुनाथ ढमकले, नगरसेवक राजेश लाटकर, आदिल फरास, डॉ. कपिल राजहंस, डॉ. सुरज बिडकर,  प्रयोज्ञी फाऊंडेशनच्या योगिता कोडोलीकर, महोत्सवाचे उपाध्यक्ष शुभम शिरहट्टी, महेश राठोड, विश्वजीत वाडकर, नितेश गणेशाचार्य, अक्षय मोरे आदी उपस्थित होते.

……………………..

शिव महोत्सवनिमित्त ‘जल्लोष तरुणाईचा’या संकल्पनेतून युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. गीत, नृत्य, लोकसंगीत सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. लोकप्रिय गायक आनंद शिंदे व उत्कर्ष शिंदे यांच्या ‘शिंदेशाही’ या गीत-संगीताच्या कार्यक्रमाने महोत्सवात बहार आणली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes