सोशल मिडीयाच्या अतिरेकामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात अडथळे - डॉ. विश्वनाथ मगदूम
schedule18 Dec 25 person by visibility 34 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी सामाजिक समस्या उद्भवत आहेत. तेव्हा सोशल मीडियाच्या मर्यादित वापरासाठी पालकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी’ असे आवाहन कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी केले.
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये वरिष्ठ विभाग शिक्षक - पालक सहविचार सभा झाली. याप्रसंगी डॉ. मगदूम यांनी पालकांशी मुक्त संवाद साधला. ते म्हणाले, ‘देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी कौन्सिल ऑफ एज्युकेशनची स्थापना करून शिक्षण सर्वसामान्यापर्यंत पोहोचविले.. प्रास्ताविकामध्ये डॉ. आर. एस. नाईक यांनी शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे विधान केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी पालकसभा आयोजनाचा उद्देश, विद्यार्थ्यांना लागलेले मोबाईलचे व्यसन आणि पालकांची भूमिका, महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच महाविद्यालयातील विविध विभाग आणि विभागा अंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम यांची माहिती दिली. प्रा. प्रविण सोरटे यांनी पालकांनी सुचविलेल्या सूचना यांचा थोडक्यात आढावा घेऊन महाविद्यालयातील विविध विभागातंर्गत यशाची थोडक्यात माहिती देऊन सर्व पालकांचे आभार व्यक्त केले.
शिक्षक पालक सहविचार सभा यशस्वी होण्यासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सदस्य अॅड. वैभव पेडणेकर, अॅड. अमित बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले सभेस प्रा. मोबीन मुजावर, प्रा. शहाजी सुतार, प्रा. कोमल पोळ, प्रा. प्रथमेश पोतदार, प्रा. प्रतीक भस्मे, डॉ. एस. एस. गवई, प्रा. के. डी.दिंडे आदी उपस्थित होते. प्रा.बी. ए. कश्यप यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रवीण सोरटे यांनी आभार मानले.