Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टाकाऊतून टिकाऊ, भंगारातील गाडयांचे ट्रकमध्ये रुपांतर ! कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आयुक्तांची शाबासकी ! !काँग्रेसचे नगरसेवक धावले पंपिंग स्टेशनकडे, आयुक्त अधिकाऱ्यांकडूनही पाहणीपाण्याच्या उपलब्धतेच्या ठिकाणांवरील उपसाबंदी उठवावी, इरिगेशन फेडरेशनची मागणीटिक टिक वाजते डोक्यात… उलगडले घडयाळाशी जुळलेले बंध ! प्रकटला राजकारणापलीकडील कृतज्ञतेचा भाव !!जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ, २६६ खेळाडूंचा सहभागटीईटी परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज, शहरातील ५४ केंद्रावर ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्तीज्युनिअर कॉलेजच्या संचमान्यतेवरुन आमदारांचा हल्लाबोल ! शिक्षण आयुक्त हटवा...शिक्षण क्षेत्र वाचवा !!उत्साह, स्वागत - नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा  वाजली !  प्रवेशोत्सवासह नशामुक्त कोल्हापूरची शपथ !! चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले, उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, आनंद शिंदेजिप कर्मचारी सोसायटीतर्फे साडेबारा टक्के लाभांश, आजपासून सभासदांच्या खात्यावर रक्कम जमा

जाहिरात

 

टीईटी परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज, शहरातील ५४ केंद्रावर ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

schedule16 Jun 26 person by visibility 180 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :   येत्या २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शिक्षण विभागाची यंत्रणा सज्ज झाली असून शहरातील ५४ केंद्रावरती एकूण ८०० शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती असल्याची माहिती प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ . मीना शेंडकर यांनी दिली.

मुख्याध्यापक संघामध्ये आयोजित केंद्रसंचालकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. महाटीईटी परीक्षेचे कामकाज केंद्रसंचालकांनी गांभिर्याने घ्यावे असे आवाहन करून त्यांनी  केंद्रसंचालकांना महत्वाच्या सूचना दिल्या. या परीक्षेसाठी विनाअनुदानित  शाळांच्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करावयाचे नाही असेही सांगितले. शिवाय या काळात संपूर्ण कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहित केल्याचे सूचक विधान केले. 

विस्तार अधिकारी डॉ. विश्वास सुतार यांनी माहितीपुस्तिकेचे विवेचन केले. कर्तव्य आणि जबाबदारीचे भान केंद्रसंचालकांनी ठेवून जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले . येत्या शनिवारी झोनल अधिकारी प्रत्येक केंद्रावर जाऊन भौतिक सुविधांची पहाणी करतील याबाबत केंद्रसंचालकांना सजग केले . परीक्षेसाठी एकूण नऊ माध्यम भाषा असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. परीक्षा १५० गुणांची असून यासाठी १५० मिनीटे वेळ परीक्षार्थींसाठी असणार आहे एका वर्गात २४ विद्यार्थी असणार असून बैठकीसाठी झिगझॅग व्यवस्था आह. पाच खोल्यांमागे एक पर्यवेक्षक असणार आहे. यावेळी डॉ सुतार यांनी  पुस्तिकेतील मार्गदर्शक सूचनांचे वाचन केले.  प्रशासन अधिकारी जयश्री जाधव यांनी आभार मानले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes