Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक संघातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर, २९ मार्चला पुरस्कार वितरणगोकुळकडून महिला दूध उत्पादकांसाठी नारी सन्मान विमा योजना खासगी प्राथमिकतर्फे मालवणमध्ये महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन, प्राध्यापक निलंबित ! चौकशी समितीची स्थापना डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी चौदावा दीक्षांत समारंभकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरगुरु-शिष्य प्रदर्शनाचा १५ रोजी प्रारंभ ! दुर्गा आजगावकर यांना युवा कलाकार पुरस्कार!!जिल्हा परिषद काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ पाटीलमहायुती म्हणून लढणार, पण नेतृत्व कोणाकडे ? भाजप- राष्ट्रवादीत चढाओढ!!राष्ट्रवादीची वेळ चुकली, शिवसेनेचा परिवहन सभापतीवर निशाणा

जाहिरात

 

गोकुळची निवडणूक हलक्यात घेऊ नका…! – शौमिका महाडिकांचे तडाखेबंद भाषण

schedule06 Mar 26 person by visibility 693 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ गोकुळच्या गेल्या निवडणुकीत काही चुका झाल्या. त्या चुका यंदा होणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. यंदा आपण महायुती म्हणून सगळेजण निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, जनसुराज्य शकती पक्ष सगळे महायुतीचे घटक आहेत. गोकुळची निवडणूक हलक्यात घेऊ नका.’असे आवाहन गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात झाली. खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितराजे घाटगे, प्रवीणसिंह पाटील, मयूरचे संजय एस. पाटील,  भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळचे संचालक अबरिश घाटगे, माजी संचालक विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, आनंद गुरव, रघु पाटील, प्रताप पाटील कावणेकर, रविश पाटील   आदींची प्रमुख उपस्थिती होती.  प्राथमिक दूध संस्थाचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीत शौमिका महाडिक यांनी तडाखेबंद भाषण करत कार्यकर्त्यांना चार्ज केले. महाडिक यांनी गोकुळच्या गेल्या पाच वर्षातील राजकारणावर ऊहापोह केला. महाडिक कुटुंबांवर तुमचं कायम प्रेम राहिलं आहे अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

महाडिक म्हणाल्या,‘ एक संचालिका म्हणून गेल्या पाच वर्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला.विविध विषयावरुन दूध उत्पादकांची बाजू घेत सत्ताधाऱ्यांच्या  विरोधात उभे ठाकरले. या निवडणुकीला सामोरे जात असताना तुमच्याकडून काही सूचना हव्या आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल, कोणाला किती जागा हे अद्याप ठलेलं नाही.मात्र या साऱ्या प्रक्रियेत ठरावांना अधिक महत्व आहे. ज्यांच्याकडे ठराव अधिक त्यांना उमेदवारी असे ठरले तर आपण कुठे कमी पडायचे नाही. या इराद्याने कामाला लागा. ठराव गोळा करण्यात कसलाही हलगर्जीपणा नको. कारण जेवढे ठराव जास्त तिक्या जागा मिळवण्यासाठी मदत होईल. यामुळे जास्तीत जास्त ठराव आपल्याकडे येतील यासाठी प्रयत्न करा. गोकुळच्या निवडणुकीला हलक्यात घेऊ नका.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes