Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उच्चांकी गर्दी, अठरा कोटींची उलाढाल ! भीमा कृषी प्रदर्शनाचा रेकॉर्ड!!आता विश्रांती नाही, गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार - सतेज पाटील थकीत भत्त्यासाठी शिक्षकांचा शुक्रवारी महापालिकेसमोर शंखध्वनी आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया कोरेंच्या  उपस्थितीत चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, जनसुराज्य व भाजप म्हणजे दोन शरीर- एक आत्मातात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडजिल्हा परिषदेत मोठा भाऊ कोण ? भाजप - राष्ट्रवादीत भाऊबंदकी, अध्यक्षपदावरुन घासाघीस ! !तारा भवाळकर, भास्कर पेरे,अशोक रोकडेंना पुरस्कार ! बुधवारी वितरण समारंभ ! !राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सत्कारअकरा किलोचा भोपळा ! दहा किलोचा कोहळा सुरण, एक किलोचे वांगे! !

जाहिरात

 

संजय गांधी निराधार योजनेच्या शहराध्यक्षपदी दीपक चव्हाण

schedule15 Feb 26 person by visibility 31 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि महाराष्ट्र नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक रंगराव चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी निवड केली आहे. संजय गांधी निराधार योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून यांतर्गत गरजू व्यक्तींना आर्थिक सहाय्य, वैद्यकीय मदत आणि सामाजिक संरक्षण मिळते. दीपक चव्हाण हे शिवसेना पक्षाचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांनी शाखाप्रमुख, उप शहर प्रमुख पदावर काम केले आहे ते आमदर क्षीरसागर यांचे निकटवर्तीय आहेत ते आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कोल्हापूर शहर प्रमुखपदा पासून त्यांच्या सोबत आहेत. पालकमंत्री आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार क्षीरसागर यांच्या सक्रिय सहभागाने ही नियुक्ती करण्यात आली. या पदावर एक प्रामाणिक कार्यकर्त्याची निवड करण्यात आली अशी भावना निर्माण झाली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes