Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

डीवाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर ठरला राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा विजेता

schedule12 Feb 26 person by visibility 34 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भारती विद्यापीठ पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ‘खेलो भारती’ आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद मिळवले आहे.

 ही इंजीनियरिंग आणि आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत  एकूण १८ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये डी वाय पाटील आर्किटेक्चर संघाने पहिल्या साखळी सामन्यात प्रिन्स शिवाजी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर २-० गोलफरकाने विजय मिळवला. सिंहगड कॉलेज संघावर १-० तर भारती विद्यापीठ संघावर १-० ने विजय मिळवत  उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यातही  प्रिन्स शिवाजी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-० असा विजय मिळवत दिमाखात  अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग कॉलेज संघावर दोन अप्रतिम गोल करत डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपदावर नाव कोरले.

   विजेत्या संघात कर्णधार अनिश पवार,  गोलरक्षक यश पवार,  ओम सुतार,  रितेश कोरवी,  श्रेयस खवरे, आदित्य गवळी, वेदांत खारशिंगे, विजयसिंह घाडगे, पुष्कर मालगावकर, देवाशीष सरनोबत, आर्यन खवटे, प्रसाद पाटील, सुजल हळदे, यश पवार, अथर्व जाधव या खेळाडूंचा समावेश होता.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता,  प्राचार्य डॉ. संतोष चेडे,  डीन स्टुडन्ट अफेयर्स प्रा. डॉ. राहुल पाटील,  आर्किटेक्चर विभाग प्रमुख प्रा. आय एस जाधव व क्रीडा समन्वयक प्रा. कृष्णाली पाटील यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes