शाहू महाराज हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
schedule12 Feb 26 person by visibility 36 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल या शैक्षणिक संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधीक्षक जयश्री तानाजी गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, मुख्याध्यापक बी.जे.सावंत व प्राथमिक विदयामंदिरचे मुख्याध्यापक एस.व्ही.पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती एस. एस.मोहिते यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी रिद्धी मानेने मनोगतातून या शाळेने दिलेली ज्ञान आणि संस्काराची शिदोरी घेऊन आम्ही भविष्यात उज्वल यश प्राप्त करू असे वक्तव्य केले. इयत्ता नववीतील रिद्धी चौगुलेने दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस. एस .लवटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलिस अधीक्षक गायकवाड यांनी, विद्यार्थ्यांना परिश्रम करा, अभ्यास करा आणि आपले करिअर चांगले घडवा असे सांगितले. याप्रसंगी हरवलेले पैशाचे पाकीट प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल यथार्थ कांबळे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवानी महाडिक या विद्यार्थिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ए.के. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.