Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कार डीलर्स आंदोलनाच्या पावित्र्यात, गुरुवारी ठोकणार आरटीओ कार्यालयाला टाळेराजेश क्षीरसागरांच्या भाषणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली, हद्दवाढीसह विकास प्रकल्पांना मिळणार चालना लिंगायत समाजाचा कोल्हापुरात एल्गार ! आमदार शिवाजी पाटलांची मध्यस्थी, मुख्यमंत्र्यांच्यासोबत मंगळवारी मंत्रालयात बैठक ! !कोल्हापूरवर आमचे विशेष प्रेम, शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसठठ डदशहीद शिक्षण परिवाराने दिले स्वप्नांना बळ, डोंगराळ भागातील मुलांनी केली यूपीएससी परीक्षा सरअभाविपतर्फे गुणवंत विद्यार्थी छात्र सोहळा उत्साहातसीपीआरमध्ये विनाछेद यशस्वी हृदयशस्त्रक्रिया लिंगायत समाजाचे रविवारी धरणे आंदोलन, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदनमुख्यमंत्री महोदय !  विद्रूपीकरणाचे उद्घाटन करू नका, मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन ! ! 

जाहिरात

 

कार डीलर्स आंदोलनाच्या पावित्र्यात, गुरुवारी ठोकणार आरटीओ कार्यालयाला टाळे

schedule10 Aug 26 person by visibility 18 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आरटीओ विभागाच्या जाचक अटीमुळे वाहनधारकासह कार विक्रेत्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आरटीओ विभागाने जाचक नियमावली रद्द कराव्यात तसेच नोंदणी पोर्टल तात्काळ सुरू करावे अन्यथा गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा इशारा दिला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 5000 इतकी कार विक्रेत्यांची संख्या आहे मात्र गेली दोन महिने नोंदणी पोर्टल बंद आहे यामुळे वाहनधारकासह कार डीलर्स  व सरकारचेही आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील दोन्ही मंत्रांच्याकडे हे यासंदर्भात पाठपुरावा केला मात्र त्यांनी फारशी दखल घेतली नाही अशी खंत ही कार्ड डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली

  कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन पोर्टल पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाहन खरेदी-विक्री, नाव हस्तांतरण आणि नवीन नोंदणी ही सर्व कामे ठप्प झाली आहेत. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडाल .नागरिक व कार डीलर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे इजाज नागरकट्टी यांनी सांगितले. आरटीओ ऑफिस कडून अचानकपणे निर्णय लादले जातात कोणाशी चर्चा केली जात नाही यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो असेही पदाधिकाऱ्याने सांगितले. आरसी बुक व आधार कार्ड वरील नावाच्या स्पेलिंगमध्येही चुका असतील तर वाहनधारकांना दंडात्मक कारवाई केली जात आहे हा निर्णय अचानकपणे घेतला गेला त्याविषयी वाहनधारकांनाही काही कल्पना नाही असेही सांगितले आरटीओ विभागाने तत्काळ पोर्टल कार्यान्वित करावे अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला विक्रम मोतीपुरे, जमीर सय्यद ,अभिजीत चित्रकार, सुधाकर सासने,प्रशांत पाटील, किरण पाटील, समीर मुल्ला, फैयाज अथणीकर, महेश सकपाळ, शितल दत्तवाडे, समीर तकीलदार  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes