राजेश क्षीरसागरांच्या भाषणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली, हद्दवाढीसह विकास प्रकल्पांना मिळणार चालना
schedule10 Aug 26 person by visibility 19 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात विविध हेरिटेज वास्तू उभारल्या आहेत., कोल्हापुरात ७४ हेरिटेज वास्तू आहेत. सरकारमार्फत या सर्व वास्तूंचे जतन व संवर्धन करावे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. कोल्हापुरे हेरिटेज सिटी म्हणून घोषित करावे.’अशी आग्रही मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेज अंबाबाई तीर्थ क्षेत्र विकास आराखडा अंमलबजावणी करताना तो मंदिरापासून दहा मीटर अंतरापर्यंत करावा असेही ते म्हणाले. कोल्हापूरची हद्दवाढ, भुयारी मार्ग, उड्डाणपूल गरजेचे आहेत.’असे ते म्हणाले. दरम्यान आमदार क्षीरसागर यांच्या भाषणातील हद्दवाढीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणात, ‘कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेच आहे.’असे नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरातील १८५० कोटीच्या विकासकामांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा रविवारी, ९ ऑगस्ट रोजी झाला. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण, रंकाळा येथील म्युझिकल फाऊंटन, छत्रपती प्रमिराजे रुग्णालयाच्या नूतनीकरण केलेली इमारत, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेला गृहप्रकल्प, पूरनियंत्रण प्रकल्प अशा विविध कामांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, महापौर रुपाराणी निकम आदींच्या उपस्थितीमध्ये प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला.
‘आजचा दिवस हा कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. अंत्यय महत्वाचा दिवस आहे.’असे आमदार क्षीरसागर यांनी भाषणाच्या प्रारंभीच नमूद केले. क्षीरसागर म्हणाले, ‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण येते. महायुती सरकारने कोल्हापुरात विविध विकासकामांना चालना दिली. आयटीपार्क, विमानतळ, सारथीची इमारत, रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण अशी विविध प्रकल्प आहेत. अंबाबाई मंदिर विकास आराखडयासाठी दहा मीटरपर्यंत जागा संपादन करुन विकास करावा. तीस मीटर जागा संपादित केल्यास लोकांची घरे, व्यावसायिकांची दुकाने जाातील. तेव्हा मंदिर विकास आराखडा अंतर्गत दहा मीटर जागा संपादणूक करावी. शहरात पार्किंग आणि वाहतुकीची मोठी समस्या आहे. त्यासाठी छत्रपती शाहू स्टेडियमपासून भुयारी मार्ग तयार करावा. तेथून शाहू मिलपर्यंत, पुढे शिवाजी विद्यापीठ चौकापर्यंत भुयारी मार्ग करुन वाहतूक सुविधा करता येईल.’असे सांगत आमदार क्षीरसागर यांनी, मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून, ‘दृष्टी विकासाची ध्यास महाराष्ट्राच, निर्णय धाडसी विश्वास जनतेचा ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास घडे महाराष्ट्राचा !! ’या ओळी सादर केल्या. दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही कोल्हापूरची हद्दवाढ आवश्यक असल्याचे सांगितले.