Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, हसन मुश्रीफांची कोपरखळी

जाहिरात

 

माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त गोंधळ ; समायोजन प्रक्रियेस कासवगती        

schedule31 Mar 26 person by visibility 93 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,  : जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांसाठी सोमवारी 30 मार्च रोजी कदमवाडी रोड येथील श्री शाहू महाविद्यालयामध्ये समायोजन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित राहिलेल्या अतिरिक्त शिक्षक त्या शाळांचे मुख्याध्यापक तसेच ज्या शाळांमध्ये हे शिक्षक समायोजित होणार आहेत त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि क्लार्क अशा सर्व घटकांना माध्यमिक शिक्षण विभागामार्फत अतिरिक्त शिक्षक समायोजन शिबिरासाठी बोलावले होते. साडेनऊला आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अतिरिक समायोजनाच्या प्रत्यक्षात कामकाजाची सुरुवात अकरा नंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली .

 श्री शाहू महाविद्यालयातील तिसऱ्या मजल्यावरती पत्र्याचे आच्छादन असणाऱ्या आणि पंखे उपलब्ध नसणाऱ्या हॉलमध्ये जवळपास सातशेहून अधिक  विविध जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक संस्थाचालक आदी घटक उपलब्ध होते . सातशेहून अधिक कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी एकच गर्दी झाल्या कारणाने माध्यमिक शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ दृष्टिक्षेपात आला। साडेनऊला आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अतिरिक समायोजनाच्या प्रत्यक्षात कामकाजाची सुरुवात अकरा नंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. इयत्ता पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी आणि इयत्ता नववी ते दहावी असेच तर समायोजन भरती प्रक्रियेसाठी होते. प्रथमता कोणता स्तर घ्यावा याचे नियोजन नसल्या कारणाने अधिकारी वर्ग उपस्थित कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देत होते . शिक्षक कर्मचारी घामाघुन झालेले दिसताच एकच गोंधळ सुरू झाला आणि नियोजनाचा अभावी अधिकाऱ्यांना प्रथम दहावी स्तर अंमलबजावणी होईल आणि त्यानंतर सहावी ते आठवी व सर्वात शेवटी इयत्ता पाचवीच्या वर्गासाठीच्या शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल असा आदेश देण्यात आला.

 त्यानंतर गर्दीची थोडी पांगापांग होऊन अतिरिक्त समायोजनाच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. अतिरिक्त ठरणारे शिक्षक पूर्वीची शाळा आणि मागणी केलेली शाळा असा उद्घोष ध्वनीक्षेपका वरून करीत होते . संबंधित शिक्षकांनी मागणी केलेली शाळा आणि त्या ठिकाणी उपलब्ध रोस्टर असेल तरच मागणीनुसार शाळा मिळत होती. या प्रक्रियेमध्ये सुद्धा खूपच वेळ दिला प्रत्यक्षात सकाळी चालणारे काम हे संध्याकाळी चार पर्यंत सुरूच राहिले. यामध्ये काही शिक्षकांची अपेक्षापूर्ती तर काही शिक्षकांना अपेक्षाभंग स्वीकारावा लागला . काही शाळांच्या अतिरिक्त समायोजनाची प्रक्रिया विशिष्ट कारणासाठी प्रलंबीत ठेवण्यात आली. मात्र संथगतीने चालणाऱ्या या प्रक्रियेमुळे विनाकारण वेळ काढून केल्याने आणि नियोजनाचा अभाव नसल्याने माध्यमिक शिक्षण विभागाचा "अति "रिक्त सावळा गोंधळ पाहावयास मिळाला.या अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेसाठी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, हनुमंत बिराजदार, आर आर चौगुले, विस्तार अधिकारी डी. एम. पाटील उपस्थित होते . शिक्षक नेते दादा लाड यांनी देखील या कामकाजाची पाहणी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes