Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ! वेताळमाळ तालीम, विजयी!!छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात ८८ सौर प्रकल्प प्रस्तावित

schedule20 Dec 24 person by visibility 579 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी (एकूण क्षमता १७० मेगावॅट) व सांगली जिल्ह्यात ३४ ठिकाणी (एकूण क्षमता २०७ मेगावॅट)  सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांची एकत्रित क्षमता ३७७ मेगावॅट आहे.

 या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ७५ कृषी वाहीन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे.

राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून सांगली जिल्ह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प जत तालुक्यातील बसरगी  येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे बसरगी, सिंदुर व गुगवाड या गावांतील ११०० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा शक्य होणार आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील हा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांचे व त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख कार्यालय व जिल्हा परिषद यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. अशा सौर प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना सरकारकडून एकरकमी पाच लाख अनुदान देण्यात येत आहे.

.............................

सौर प्रकल्प ग्राहक हिताचे

“वीज ग्राहक व शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीकरता दिवसा वीज मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत. दोन्ही जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा. तसेच उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून महावितरणला सहकार्य करावे.”

  • स्वप्नील काटकर, मुख्य अभियंता, महावितरण

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes