Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महाराणी ताराराणींच्या जीवनकर्तृत्वावर चित्रमय चरित्र ग्रंथ निर्मिती सरोज पाटील यांना पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार जाहीर, शनिवारी वितरण समारंभ महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी बिंदू चौकात अभिवादनअगोदर फॉर्म्युला निश्चित करा, मगच नियोजन समितीतील विकासकामांच्या आराखडयांना मंजुरी : स्थायी समितीचा आक्रमक पवित्रासंवादातून समन्वय, समन्वयातून सहकार्य आणि सहकार्यातून परिवर्तन! कुलगुरू व्यंकट गीतेंचा विद्यार्थ्यांशी संवादसी - टीईटी परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र देण्याची मागणी मान्य :राज्याध्यक्ष भरत रसाळेविकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान -कौशल्यांचा उपयोग करावा : राज्यपाल जिष्णू देव वर्माकोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएचडीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी सरदार दिंडे, व्हाईस चेअरमनपदी सोनाली गुरवसंविधान दिनानिमित्त सांगलीत ग्रंथ प्रदर्शन, दहा डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुले

जाहिरात

 

सरोज पाटील यांना पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार जाहीर, शनिवारी वितरण समारंभ

schedule28 Nov 26 person by visibility 156 categoryसामाजिक

महाराष्ट्र  न्यूज   वन प्रतिनिधी कोल्हापूर - कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन व राजर्षी शाहू अध्यासन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' यावर्षी  सामाजिक कार्यकर्त्या  सरोज नारायण (एन. डी.) पाटील यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी  दिली.शनिवारी पाच डिसेंबर 2026 रोजी सायंकाळी ४.३० वाजता, साने गुरुजी वसाहत परिसरातील सूर्यवंशी कॉलनीतील मृत्युंजय सांस्कृतिक सभागृह येथे स होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल व रोख ११,००० रुपये असे आहे

पाटील या रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्यपदी कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. तसेच त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. पुरस्काराचे वितरण बालकल्याण संकुलचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेश शिपूरकर यांच्या  हस्ते पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.पुरस्काराचे चौथे वर्ष  आहे.

 पवार ट्रस्टच्या खजिनदार श्रध्दा पवार यांचे "जननायक राजर्षी शाहू महाराज" या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या  हस्ते स होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व लेखिका वसुधा जयसिंगराव पवार असणार आहेत.कार्यक्रमासाठी श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सुमन वसंतराव देशमुख, श्रीराम ज्ञानपीठ वाशीच्या संचालिका अनिता भीमराव पाटील, नगरसेविका संगीता संजय सावंत आणि मंत्रालयातील अवर सचिव‌ राजकुंवर संदीप डफळे-पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे. याप्रसंगी स्वर्गीय प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या गावातील 
राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालय, ढवळी (जि. सांगली) या विद्यालयास २५ पुस्तकांचा संच भेट म्हणून देणार आहोत.  पत्रकार परिषदेला  श्रीराम ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी. ए. पाटील, पाटील,  विलास पाटील, पांडुरंग माळी, प्रा. दिग्विजय पवार आदी उपस्थित होते.. .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes