Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहात

schedule13 Sep 26 person by visibility 93 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी युवावर्स हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामधील विविध स्पर्धामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेसह आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला. 

युवावर्समध्ये वक्तृत्व स्पर्धा, लॅन गेमिंग, गेस अँड गिगल, पोस्टर प्रेसेंटेशन, मॉडेल मेकिंग अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. तसेच नृत्य स्पर्धेमध्ये वीस ग्रुपने सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ.ए. के. गुप्ता, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम यांच्या हस्ते करण्यात आले.

  स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. नृत्य स्पर्धेसाठी रविराज मोरे आणि रणजीत दुधाणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच मेकॅनिकल सिविल आणि कॉम्प्युटरविभागातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके, विभागप्रमुख डॉ.पी.के. शिंदे, प्रा.अक्षय करपे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. शितल साळोखे आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes