Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिक

schedule13 Sep 26 person by visibility 260 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार दरबारी प्रभावीपणे मांडणारे शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांच्यासारखे सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि शिक्षण क्षेत्राशी सातत्याने जोडलेले नेतृत्व विधानपरिषदेत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी घेतलेली भूमिका आणि केलेले संघटनात्मक कार्य उल्लेखनीय आहे. आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात त्यांचे नेतृत्व निश्चितच प्रभावी ठरेल. तेव्हा आगामी शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री आणि पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार’ असे प्रतिपादन  खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर, जिल्हा-शहर शिक्षक लोकशाही आघाडी आणि माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय आदर्श संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार महाडिक बोलत होते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  

 कार्याध्यक्ष प्राचार्य साळुंखे यांनी़, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव असणारे अभ्यासू, होतकरु, धाडसी, तरुण तडफदार नेतृत्व कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आमदार  म्हणून  विधानपरिषदेत पाठविण्याची कामगिरी आपणा सर्वांना करावयाची आहे, असे मत मांडले. कौस्तुभ गावडे यांनी आजच्या काळात शिक्षकांवर विविध मार्गानी अन्याय होत आहे.  तो कमी केल्याशिवाय मी थांबणार नाही. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जी. के. थोरात यांनी, शिक्षकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे यांच्यासारख्या कार्यक्षम आणि अभ्यासू नेतृत्व हवे.’

माजी आमदार बाबासाहेब पाटील, जयकुमार देसाई, डॉ. सतिश घाळी यांना जीवनगाौरव पुरस्कार

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण  संस्थेच्या विद्यासमितीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम साळुंखे म्हणाले, ‘कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेतली असून त्यांचे संघटनात्मक कार्य आश्वासक आहे. त्यांना आमदार म्हणून  विधान परिषदेत पाठविण्यासाठी सर्व शिक्षकांनी जीवाचे रान करावे.’ यावेळी टीडीएफ चे प्रदेश सचिव  के.एस.ढोमसे, माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर, प्रा. जयकुमार मल्हार देसाई, डॉ.सतिश घाळी, डॉ.के.एस.चौगुले यांना जीवनगौरव पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षकदूत पुरस्कार कोजिमाशिचे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  तसेच अनिल ईश्वरा चव्हाण यांना आदर्श साहित्यिक पुरस्कार देण्यात आला.  यावेळी कोल्हापूर  जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ आदर्श संस्थाचालक, 17  मुख्याध्यापक व ४९  शिक्षक व शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह् व मानपत्र देऊन  गौरव करण्यात आला.  टीडीएफ पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे यांनी प्रास्ताविक केले.  पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे  अध्यक्ष सुरेश खोत यांनी आभार मानले.प्रा.अशोक पाटील यांनी सूत्रसंचालन केले.  यावेळी बी. डी. पाटील, बी. एस. खामकर, संजय चोरमारे, राहुल कुंभार, अशोक पलंगे हे उपस्थित होते. गायक महेश हिरमेठ यांनी प्रार्थना सादर केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes