Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटीलरानभाजी महोत्सवला जोरदार प्रतिसाद, दिवसभरात एक लाखाहून अधिक उलाढाल गोकुळसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणीगोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणारकल्पनेपासून उद्योगापर्यंत -नवउद्योजकांना उद्योगनिर्मितीची दिशाजिल्ह्यात चला शाळेत जाऊया अभियान, नोडल अधिकाऱ्याची नेमणूकजिप कर्मचारी सोसायटीतील अभ्यासिका - ग्रंथालयाचा लाभ घेऊन सभासदाच्या पाल्यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करावेशिवसेना नगरसेवकांनी घेतली जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट, कारवाई संदर्भात दिले निवेदनगोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोसमी चौगुलेएमपीएससी पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात तरुणाई रस्त्यावर

जाहिरात

 

गोकुळसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणी

schedule09 Sep 26 person by visibility 785 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीतंर्गत 18 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. 19 ऑक्टोंबर रोजी  मतमोजणी होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी चौगुले यांनी, बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. गोकुळच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गोकुळ निवडणुकीसाठी 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2026 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 23 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी आहे 24 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2026 या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. नऊ ऑक्टोबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होईल. 18 ऑक्टोबर रोजी मतदान तर 19 ऑक्टोबर रोजी  मतमोजणी होणार आहे. २५ संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. 25 संचालकामध्ये 20 संचालक सर्वसाधारण गटातून निवडले जाणार आहेत. तर दोन संचालक महिला प्रवर्ग गटातून निवडले जातील. अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त व मागासवर्ग प्रवर्गातून प्रत्येकी एक संचालक निवडला जाणार आहे. रमण मळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे निवडणूक कार्यालय असणार आहे

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes