Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वीर कक्कय विद्यालयात बाल कलाकारांचा बाजार, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा रुजविणारा उपक्रमउच्च शिक्षण संस्थांमध्ये सशक्त संशोधन संस्कृती रुजवणे काळाची गरज : डॉ. महादेव लोखंडेलिंगायत माळी समाजाच्या सांस्कृतिक केंद्र-वसतिगृह बांधकामासाठी भरीव मदत करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकरसेवा रुग्णालयातील एमआरआय-सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब - यलो फीवर लसीकरण सेंटरचे लोकार्पणडॉ. गणपती कमळकर यांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशनछत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे शनिवारी सभासदांना दिपावली भेटवस्तू वाटपसत्यजीत जाधवांनी दिले विद्यार्थिनींच्या हिताला प्राधान्य, केएमटी पास सवलतीस परिवहन समितीकडून मान्यता२९ जूनचे पदोन्नती समुपदेशन रद्द करावे, सेवाज्येष्ठ शिक्षकांचे प्रशासनाला निवेदनमनस्वी महिला समूहातर्फे रविवारी महिला शिक्षकांचा मेळावा, सत्कार सोहळाजयवंत महाविद्यालयाच्या पेटंट डिझाईनवर भारत सरकारची मंजुरीची मोहोर

जाहिरात

 

सत्यजीत जाधवांनी दिले विद्यार्थिनींच्या हिताला प्राधान्य, केएमटी पास सवलतीस परिवहन समितीकडून मान्यता

schedule31 Oct 26 person by visibility 100 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) महाविद्यालयातील ४७ विद्यार्थिनींना मंजूर करण्यात आलेल्या केएमटीच्या सवलत पास वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पासचा वापर करून संबंधित विद्यार्थिनींना केएमटी बसमधून प्रवास करता येणार असून, यामुळे विद्यार्थिनींच्या मोफत प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी दिली.

महिला व बालकल्याण समितीच्या ठरावानुसार के.एम.सी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ४७ केएमटी सवलत पास तयार करण्यात आले होते. मात्र, या योजनेला परिवहन समितीची अंतिम मान्यता नसल्याने ३० ऑक्टोबर रोजी परिवहन उपक्रमाने महाविद्यालयाला पत्र पाठवून मान्यता मिळेपर्यंत पासचा वापर करू नये, असे स्पष्ट केले होते. यावरून महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि परिवहन विभागातील समन्वयाचा अभाव तसेच परिवहन समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा मुद्दा चर्चेत आला होता.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, हा मुद्दा प्राधान्याने विचारात घेऊन सभापती जाधव यांनी परिवहन समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही या प्रकरणी जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त करून माफी मागितल्याची बाब विचारात घेण्यात आली. त्यानंतर कोणताही कटुता किंवा प्रशासकीय वाद न वाढविता विद्यार्थ्यांच्या हितासाठी सामंजस्याची भूमिका घेण्याचा निर्णय झाला.

…………..

" विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणे किंवा त्यांच्यावर आर्थिक भार पडणे योग्य नाही. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काही प्रशासकीय बाबींवर मतभेद असू शकतात; मात्र त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होता कामा नये. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परिवहन समितीने सकारात्मक भूमिका घेतली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना मंजूर सवलत पासचा वापर करता यावा, यासाठी मान्यता देण्यात आली आहे. भविष्यात अशा योजना राबविताना सर्व विभागांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने काम करणे आवश्यक आहे."

  • सत्यजीत चंद्रकांत जाधव, सभापती परिवहन समिती महानगरपालिका कोल्हापूर

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes