Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर फर्स्टचा सोमवारी वर्धापनदिन, महापालिकेस करणार स्विपींग मशिन प्रदानगोकुळमध्ये महिला दिनानिमित्त विविध उपक्रम वूमेन इन लीडरशिप कार्यक्रमात उलगडली स्त्रीशक्तीची कर्तबगारी सांगलीत मंत्र्यांनी केले विद्यार्थिनींचे औक्षण, चंद्रकांत पाटलांच्याकडून स्त्रीशक्तीचा सन्मानस्वप्नांना बळ अन् संस्कारी शिक्षण ग्रामीण भागामध्ये देणारा शहीद  पॅटर्न कौतुकास्पद :  राज देशमुखशिक्षक संघातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर, २९ मार्चला पुरस्कार वितरणगोकुळकडून महिला दूध उत्पादकांसाठी नारी सन्मान विमा योजना खासगी प्राथमिकतर्फे मालवणमध्ये महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन, प्राध्यापक निलंबित ! चौकशी समितीची स्थापना डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी चौदावा दीक्षांत समारंभ

जाहिरात

 

गोकुळमध्ये महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

schedule08 Mar 26 person by visibility 69 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कोल्हापूर जिल्हा सहकारी कर्मचारी संघटना आयटक यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून उत्सव मल्टीपर्पज हॉल गोकुळ शिरगाव येथे महिला मेळावा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. आयटक नॅशनल कौन्सिल सदस्या कॉ.बबली रावत, प्रा.स्मिता केरिमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

 चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचे मोठे योगदान असते. त्याचप्रमाणे गोकुळ दूध संघाच्या प्रगतीमध्येही महिला दूध उत्पादकांचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला दुग्ध व्यवसायात सक्रियपणे काम करत असून त्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महिलांनी मनापासून प्रयत्न केले तर दुग्ध व्यवसाय अधिक यशस्वी होऊ शकतो, याची अनेक उदाहरणे आपल्या आसपास पाहायला मिळतात. कार्यक्रमाची  सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर “मी कोण?” या विषयावर कॉम्रेड बबली रावत यांनी व्यक्तिमत्वाची जाणीव, आत्मभान आणि समाजातील आपली भूमिका याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.  दुसऱ्या सत्रात “सोहळा आनंदी आयुष्याचा” या विषयावर प्रा. स्मिता केरीमाने यांनी मार्गदर्शन केले.  शाहीर सदाशिव निकम व सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत मृण्मयी सातवेकर व प्रास्ताविक संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम यांनी तर संपदा थोरात यांनी आभार मानले.  संघाचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, रणजीतसिंह पाटील, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, कॉ.बबली रावत, पद्मजा आपटे, कॉ.दिलीप पोवार, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, संघाचे अधिकारी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, डॉ.प्रकाश साळुंके, कर्मचारी पतसंस्था चेअरमन माधुरी बसवर, गीता मोरे, डॉ.अश्विनी गाणे, तुनजाराणी घाटगे, तुप्ती देसाई, पूजा चिंगरे, राजश्री खाडे,कविता मगदूम, रुपाली देसाई, शुभदा पाटील, सरिता चव्हाण, सरिता मदनाईक, तृप्ती मदने, शुभदा जोशी, सुनिता कांबळे, गीता उत्तुरकर, बाजीराव राणे उपस्थित होते. 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes